विक्रमगडात अतिक्रमण हटाव

By Admin | Updated: February 13, 2017 04:44 IST2017-02-13T04:44:48+5:302017-02-13T04:44:48+5:30

एका शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणाला बांधकाम खात्यांने दणका दिला असून २०० अतिक्रमणे केलेल्या दुकानदारांना नोटीसा

Vikramgadat removal of encroachment | विक्रमगडात अतिक्रमण हटाव

विक्रमगडात अतिक्रमण हटाव

विक्रमगड : एका शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणाला बांधकाम खात्यांने दणका दिला असून २०० अतिक्रमणे केलेल्या दुकानदारांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. दोन दिवसांत गटारावरील अतिक्रमणे हटविली नाहीत तर बांधकाम विभागाकडून ते तोडून खर्च वसूल केला जाईल अशा नोटीसामुळे ही अतिक्रमणे काढण्यास सुरूवात झाली आहे.
शहरातील राज्य क्रमांक ३५ मुख्य बाजारपेठ असलेल्या रस्त्यालगत दोन्ही बाजुकडील असलेल्या गटारावरील व रस्त्यालगत असलेल्या दुकान विक्रेत्यांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत विक्रमगड नगरपंचायतच्या नगराध्यक्षानी उपोषण केले होते. या उपोषणाच्या वेळी सार्वजनिक बांधकाम खात्याने अतिक्रमण हटविले जातील असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले होते. त्याची दखल घेऊन पाऊले उचलण्यात आली आहे. पंशक्रोशीतील ग्रामस्थ या बाजारात खरेदी विक्रीसाठी येत असल्याने रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.

Web Title: Vikramgadat removal of encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.