शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

रणरणत्या उन्हात विजयदिन साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 00:40 IST

तांदुळवाडी गडावरील बहुतेक पिण्याच्या टाक्यांचे पुरातत्वीय दृष्टीने संवर्धन न झाल्याने पाण्याची साठवणूक होत नसल्याने किल्ल्याच्या एकूण संवर्धनासाठी नवीन आराखडा तयार करण्यासाठी अभ्यासक श्रीदत्त राऊत ह्यांच्या सहकार्याने अनेक दुर्गिमत्रांनी तांदुळवाडी किल्ल्याला भेट दिली.

पालघर - तांदुळवाडी गडावरील बहुतेक पिण्याच्या टाक्यांचे पुरातत्वीय दृष्टीने संवर्धन न झाल्याने पाण्याची साठवणूक होत नसल्याने किल्ल्याच्या एकूण संवर्धनासाठी नवीन आराखडा तयार करण्यासाठी अभ्यासक श्रीदत्त राऊत ह्यांच्या सहकार्याने अनेक दुर्गिमत्रांनी तांदुळवाडी किल्ल्याला भेट दिली.नरवीर चिमाजी अप्पांच्या गौरवशाली वसईच्या मोहिमेतील एक महत्त्वाचा वनदुर्ग म्हणून पालघर जिह्यातील तांदुळवाडी दुर्ग इतिहास प्रसिद्ध आहे. सन १७३७ मध्ये चिमाजीअप्पाच्या उत्तर कोकणातील मोहिमेत विठ्ठल विश्वनाथ व आवजी कवडे यांनी मे १७३७ रोजी तांदुळवाडी गड पोर्तुगीजांकडून जिंकला. या घटनेस यंदा २८२ वर्षे पूर्ण झाली असून यंदाचा हा दिवस तांदुळवाडी गड विजयदिन ठरला. किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत दिनांक ४ मे २०१९ शनिवार चैत्र कृ ३० रोजी तांदुळवाडी गडाच्या विजयदिनाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर उपक्र मात स्थानिक युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर परिवाराच्या दुर्गिमत्रांनी सिक्रय सहभाग नोंदवला. वाढत्या उन्हाचा प्रभाव वाढत असतानाही एकूण ११ दुर्गिमत्रांनी सकाळी ८ वाजता तांदुळवाडी गडाच्या सोंड वाटेची चढाई सुरू केली. दिवसभराच्या उपक्र मात वास्तुदेवता पूजन, इतिहास मार्गदर्शन सफर, संवर्धन मोहिमेची दिशा, ज्ञात अज्ञात इतिहासाची पाने, भगवा ध्वज मानवंदना, महादरवाजा पूजन इत्यादीं कार्यक्र म हाती घेण्यात आले. तांदुळवाडी गडाच्या मुख्य महादरवाजा बुरु जाचा परिसर दुर्गिमत्रांनी तोरणे लावून सुशोभित केलेला होता. यावेळी महादरवाज्यावर शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे व शस्त्र पूजन करण्यात आले. तांदुळवाडी गडावरील बहुतेक पिण्याच्या टाक्यांचे पुरातत्वीय दृष्टीने संवर्धन न झाल्याने गडावरील पाण्याची गैरसोय वाढीस लागल्याचे चित्र दिसून आले. यात बहुतेक पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांच्या संवर्धनासाठी नवीन आराखडा तयार करावा लागणार असे लक्षात आले. सदर मोहिमेत किल्ले वसई मोहिमेचे इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी सहभागी दुर्गिमत्रांना मार्गदर्शन केले.युवा शक्ती प्रतिष्ठानचे प्रतिनिधी प्रीतम पाटील यांनी तांदुळवाडी गडाच्या बालेकिल्ला वास्तूमधील मूळ देवस्थानाची सध्या झालेली दुरवस्था यावर एकित्रतपणे श्रमदान करण्याचे आवाहन केले. तर प्रतिनिधी मानसी शिरगावकर यानी तांदुळवाडी गडाची खडतर चढाई व गडावरील पाण्याची दुरावस्था लक्षात घेता आगामी काळात स्थानिक दुर्गिमत्रांच्या सक्र ीय सहभागातून संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार असल्याचे मत व्यक्त केले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार