सरस्वतीपूजनाने शाळेत विजयादशमी साजरी
By Admin | Updated: October 23, 2015 00:08 IST2015-10-23T00:08:39+5:302015-10-23T00:08:39+5:30
तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी विजयादशमीच्या निमित्ताने पाटीपूजन व सरस्वतीमातेचे पूजन करून दसरा सण साजरा केला.

सरस्वतीपूजनाने शाळेत विजयादशमी साजरी
वाडा : तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी विजयादशमीच्या निमित्ताने पाटीपूजन व सरस्वतीमातेचे पूजन करून दसरा सण साजरा केला.
वाडा तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना विजयादशमीच्या निमित्ताने सुटी होती. मात्र, सुटी असूनही जिल्हापरिषदेच्या ३०२ शाळांतील शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी सकाळी शाळा भरविली होती.
ग्रामीण भागात आजही अशा पद्धतीने सरस्वतीचे पूजन केले जाते, ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. त्यामुळेच आजही ही परंपरा जपल्याचे येथील शिक्षक सांगतात. या वेळी विद्यार्थ्यांचा उत्साह देखील ओसंडून वाहत होता. (वार्ताहर)