शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

Video : महामार्गावर ट्रकचा भडका, आगीचे लोळ;  सुदैवाने जीवित हानी टळली   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2021 20:27 IST

Fire Case : गाडी थांबवून चालक व सहाय्यक खाली उतरेपर्यंत ट्रकचा भडका उडाला होता. त्यामुळे दूरवरून आगीचे लोळ उठल्याचे दिसून येत होते.  

ठळक मुद्देमहामार्ग वाहतूक पोलीस यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणली.

पारोळ :  मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील गुजरात वाहिनीवर खानिवडे टोलनाका सोडल्यानंतर सुमारे २०० मीटर  अंतर पास करून जाणाऱ्या एका ट्रकला शुक्रवारी दुपारी 3.20 च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. गाडी थांबवून चालक व सहाय्यक खाली उतरेपर्यंत ट्रकचा भडका उडाला होता. त्यामुळे दूरवरून आगीचे लोळ उठल्याचे दिसून येत होते. 

महामार्ग वाहतूक पोलीस यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून चालक व सहाय्यक दोघेही सुरक्षित आहेत. मात्र ट्रकचे व त्यातील वाहतुकीच्या सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी सदर ट्रेकला क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. 

आयआरबीच्या गस्त पथकाने दिलेल्या माहितीनुसार महामार्ग वाहतूक पोलिसांनी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवले. काही मिनिटांतच आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ज्वाळांनी घेरलेल्या ट्रकची आग शमवण्यास सुरुवात करून १० ते १५ मिनिटांत आगीवर ताबा मिळवला. प्लास्टिक पावडरच्या गोण्या भरून तो ट्रक गुजरात दिशेने निघाला होता, अशी  माहिती महामार्ग  वाहतूक पोलीस मनोर  विभागाचे प्रभारी अधिकारी प्रकाश दिंडे यांनी दिली.

 

टॅग्स :fireआगFire Brigadeअग्निशमन दलahmedabadअहमदाबादGujaratगुजरात