वसईत ‘अच्छे दिनची पुण्यतिथी ’
By Admin | Updated: June 1, 2016 02:21 IST2016-06-01T02:21:00+5:302016-06-01T02:21:00+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला आश्वासने अजूनही पूर्ण ने केल्याच्या बाबत वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वसई

वसईत ‘अच्छे दिनची पुण्यतिथी ’
वसई/ पारोळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला आश्वासने अजूनही
पूर्ण ने केल्याच्या बाबत वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वसई तहसिदार कार्यालयावर केंद्र सकारचा प्रतिकात्मक निषेध करण्यात आला.
केंद्र सरकाने १०० दिवसात विदेशातील काळापैसा आणून नागरिकांच्या खात्यात १५ लाख रूपये जमा करण्याची घोषणा, महागाई कमी करणे अशी केंद्र सरकारने जनतेला आश्वासने दिली होती. ती पूर्ण केली नसून एप्रिलला स्वस्त धान्य देण्याकरीता सरकारकडून दिले जाणारे अंशदान बंद केले.
इंदिरा आवास योजना बंद केली. महिला आदिवासी, दलित अल्पसंख्यांक अशा घटकांच्या योजनांमध्ये निधी कपात, करण्यात आल्याचे काँग्रेसने नायब तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. हया निषेधाच्या वेळी महाराष्ट्र काँग्रस प्रदेश सचिव दत्ता नर मायकल फुटयार्डो, डॅमजिक डिमेलो, रामपाटील आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)