वसईत तरुणांची बाईक मस्ती
By Admin | Updated: July 15, 2017 15:32 IST2017-07-15T15:32:05+5:302017-07-15T15:32:54+5:30
शहरात सध्या काही तरुणांची बाईक मस्ती जोरदार सुरू आहे

वसईत तरुणांची बाईक मस्ती
ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 15- शहरात सध्या काही तरुणांची बाईक मस्ती जोरदार सुरू आहे. बाईवर थरारक आणि जीवघेणे स्टंट तरुण करत आहेत. दररोज दुपारच्या सुमारास १० ते १२ जणांचा एक ग्रुप वसई पूर्वेकडील मधुबन हाइटस परिसरात अशा प्रकारचे जीवघेणे स्टंट करीत असतो. आधी आपापसात रेसिग लावली जाते. त्यांनतर चक्क चालू गाडीवर उभे राहून स्टंट करतात. दोन तीन तास अशी स्टंटबाजी सुरु असते. जवळून या तरुणांचा स्टट पाहिल्यावर हुदयाचा थरकाप होतो. या परिसरात अनेक लोक चालण्यासाठी येत असतात. तर लहान मुलं सायकल चालवतात. त्यामुळे या स्टंटबाजीमुळे त्याच्यात भीती निर्माण झाली आहे. काही दिवसापूर्वीच मुंबईत अश्या प्रकारचा स्टंट करताना एकाचा जीव गेला होता. या तरुणांना वेळीच जर रोखले नाही तर एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता आहे.