वसईत मच्छीमार नेत्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 06:04 IST2018-07-18T06:03:57+5:302018-07-18T06:04:00+5:30
वसईच्या पाचूबंदर स्थित कोळीवाड्यात राहणारे कोळी युवा शक्तीचे नेते दिलीप माठक (३८) यांनी राहत्या घरातच गळफास लावून मंगळवारी सायंकाळी आत्महत्या केली.

वसईत मच्छीमार नेत्याची आत्महत्या
वसई : वसईच्या पाचूबंदर स्थित कोळीवाड्यात राहणारे कोळी युवा शक्तीचे नेते दिलीप माठक (३८) यांनी राहत्या घरातच गळफास लावून मंगळवारी सायंकाळी आत्महत्या केली. याची वसई पोलिसांत अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. शांत, सुस्वभावी आणि अभ्यासू वृत्तीमुळे ते कोळी व अन्य समाजाचे राजकीय व सामाजिक कार्यकर्ते होते. वसईच्या अग्रगण्य अशा बॅसिन कॅथॉलिक बँकेचे ही ते संचालक होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी सेंट पीटर चर्च, कोळीवाडा येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.