वसई किल्ल्यात तरुणी बेशुद्ध; मित्र झाले गायब

By Admin | Updated: April 18, 2017 06:43 IST2017-04-18T06:43:01+5:302017-04-18T06:43:01+5:30

वसई च्या किल्ल्यात दहावीत शिकणारी एक तरुणी बेशुध्दावस्थेत आढळून आली आहे. तिला किल्ल्यात घेऊन आलेल्या मित्रांनीच मादक पदार्थ पाजल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करीतआहेत.

Vasani is unconscious; Friends are missing | वसई किल्ल्यात तरुणी बेशुद्ध; मित्र झाले गायब

वसई किल्ल्यात तरुणी बेशुद्ध; मित्र झाले गायब

वसई : वसई च्या किल्ल्यात दहावीत शिकणारी एक तरुणी बेशुध्दावस्थेत आढळून आली आहे. तिला किल्ल्यात घेऊन आलेल्या मित्रांनीच मादक पदार्थ पाजल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करीतआहेत.
रविवारी संध्याकाळी वसई किल्ल्यात निर्जन ठिकाणी एक तरुणी बेशुद्ध पडलेली लोकांना दिसली. जागृक लोकांनी वसई पोलिसांना पाचारण केली. अर्धवट शुद्धीत असलेली तरुणी तीन मित्रांची नावे घेत होती. पोलिसांनी ताबडतोब तिला सरकारी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. त्याठिकाणी तिच्यावर उपचार करण्यात आले. तरुणीचे नाव पोलिसांनी गुप्त ठेवले आहे. सदरतरुणी दहावीत शिकणारी आहे. आपल्या मित्रांसोबत ती किल्ल्यात फिरायला आली होती. त्यावेळी तिला शितपेयातून मादक पदार्थ पाजण्यात आला होता. मात्र, ती बेशुद्ध पडल्याने तिचे मित्र तिला तशाच अवस्थेत सोडून पळून गेले. सुदैवाने तिच्यावर अतिप्रसंग अथवा लैंगिक अत्याचार झाले नाहीत. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.
येथे काही महिन्यांपूर्वी नवजात बालक मृतावस्थेत आढळले होते. प्रेमीयुगुल अश्लिल चाळे करीत असतात. गर्दुल्लेही याठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असल्याने किल्ल्यात प्रवेशद्वारावर पोलीस चौकी बसवून येथे ये-जा करणारे आणि वाहनांची तपासणी करण्यात यावी. अन्यथा भविष्यात भयावह प्रसंग घडू शकतो, अशी भिती आमची वसई समुहाने केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Vasani is unconscious; Friends are missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.