वसईत सोनसाखळी चोरीच्या तीन घटना
By Admin | Updated: December 3, 2015 01:35 IST2015-12-03T01:35:48+5:302015-12-03T01:35:48+5:30
विरार पश्चिमेकडील विजय सेल्ससमोरील रोडवरून मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र पाठीमागून आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी खेचण्यासाठी तिच्या गळ्यावर हात मारला

वसईत सोनसाखळी चोरीच्या तीन घटना
पारोळ : विरार पश्चिमेकडील विजय सेल्ससमोरील रोडवरून मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र पाठीमागून आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी खेचण्यासाठी तिच्या गळ्यावर हात मारला. मात्र, हे लक्षात आल्याने ती खाली वाकली असता मंगळसूत्राऐवजी तिच्या हातातील ५३,५०० रुपयांचा आयफोन-६ हा महागडा मोबाइलच घेऊन पळ काढला. याबाबत, संबंधित महिलेने अज्ञात मोटारसायकलस्वाराविरुद्ध अर्नाळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दुसऱ्या घटनेत विरार पूर्व येथून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि चेन असा पस्तीस हजारांचा ऐवज पाठीमागून आलेल्या मोटारसायकलस्वारांनी पळवला. याबाबत, तिने विरार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तिसऱ्या घटनेत वालीव गोलाणी येथून पायी जाणाऱ्या दोघींच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले असून वालीव पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. (वार्ताहर)