१३ कोटी खर्चूनही वसईत दूषित पाणी

By Admin | Updated: April 15, 2017 03:09 IST2017-04-15T03:09:13+5:302017-04-15T03:09:13+5:30

पाणी पुरवठा व्यवस्थेवर दरवर्षी तब्बल तेरी कोटीहून अधिक रुपये खर्च केले जातात. तरीही वसईकरांना एक दिवस आड अपुरे आणि अनियमित पाणी मिळते. त्याचबरोबर दुषित

Vasaiat contaminated water after spending 13 crores | १३ कोटी खर्चूनही वसईत दूषित पाणी

१३ कोटी खर्चूनही वसईत दूषित पाणी

वसई : पाणी पुरवठा व्यवस्थेवर दरवर्षी तब्बल तेरी कोटीहून अधिक रुपये खर्च केले जातात. तरीही वसईकरांना एक दिवस आड अपुरे आणि अनियमित पाणी मिळते. त्याचबरोबर दुषित पाणीही पुरवले जाते. त्यामुळे ठेकेदारांना काळ््या यादीत टाकून महापालिकेची लूट थांबवावी अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांनी आयुक्तांकडे केली आहे.
वसई विरार शहराला सूर्या योजनेतून १०० एमएलडी, उसगाव योजनेतून २० एमएलडी, पेल्हार धरणातून १० एमएलडी आणि पापडखिंड धरणातून एक एमएलडी पाणी मिळून दररोज १३१ एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. पाणी पुरवठा वितरण, देखभाल, दुरुस्ती आणि व्यवस्थापनाकरता दरसाल ६ कोटी ७८ लाख ४० हजार ४०० रुपये खर्च केला जातो. त्याचबरोबर पाणी पुरवठा योजनांच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपये, जलशुद्धीकरणासाठी वापरण्यात येणारी रसायने यासाठी १ कोटी २२ लाक ८० हजार ८०० रुपये, क्लोरीन, गॅस टनर आणि अ‍ॅलम पुरवठा कामी ५५ लाख ५९ हजार ६०० रुपये खर्च केला जातो. त्याचबरोबर विभागीय पाणी पुरवठा व्यवस्थापनेवरही लाखो रुपये खर्च केले जातात. हा सर्व खर्च दरवर्षी १३ कोटीहून अधिक होतो. असे असतानाही महापालिकेकडून रहिवाशांना एक दिव आड तोही अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होत असतो. इतकेच नाही तर अनेक भागात दुषित पाणी पुरवठा होतो, असा चेंदवणकर यांनी आरोप केला आहे. याशिवाय दरमहा जलवाह्न्यिा फुटत आहेत. वीज पुरवठा खंडीत होत असल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होत असतो. त्यामुळे वर्षाला किमान वीस ते तीस दिवस पाणी पुरवठा खंडीत होत असतो. पण, दुरुस्तीच्या नावाखाली जनतेचे करापोटी जमा झालेले कोट्यवधी रुपये ठेकेदारांना दिले जात आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Vasaiat contaminated water after spending 13 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.