शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये ‘रेशनिंग’चा वसई-विरारकरांना आधार! तीन लाख ८२ हजार क्विंटल धान्यवाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 02:56 IST

Vasai-Virar News : वसई-विरार शहरांत साडेतीन लाख शिधापत्रिकाधारक आहेत. तर १९० शिधावाटप दुकाने आहेत. मार्चमध्ये काेरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि सरकारने लॉकडाऊन घेतला. या काळात लोकांचे रोजगार बुडाले आणि आर्थिक परिस्थिती बिकट बनली.

विरार - काेराेनामुळे घेतलेल्या लाॅकडाऊनच्या काळात एप्रिल ते ऑक्टाेबर या सात महिन्यांत वसई-विरारकरांनी वसई-विरारमधील शिधावाटप दुकानांतून विक्रमी तीन लाख ८२ हजार क्विंटल धान्याची विक्री झाली. शिधावाटप केंद्रातून प्रथमच ९५ टक्के एवढी धान्यविक्री झाली आहे.वसई-विरार शहरांत साडेतीन लाख शिधापत्रिकाधारक आहेत. तर १९० शिधावाटप दुकाने आहेत. मार्चमध्ये काेरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि सरकारने लॉकडाऊन घेतला. या काळात लोकांचे रोजगार बुडाले आणि आर्थिक परिस्थिती बिकट बनली. त्यामुळे नागरिकांनी शिधावाटप दुकानांत मिळणारे धान्य घेण्यास गर्दी केली हाेती. एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये वसईच्या पुरवठा खात्याने एक लाख ७७ हजार ६०४ क्विंटल धान्य शिधावाटप दुकानांत उपलब्ध केले होते. त्यापैकी एक लाख ६९ हजार ६७३ क्विंटल धान्य लोकांनी घेतले. केंद्र शासनाच्या योजनेनुसार एक लाख ८१ हजार २६१ क्विंटल धान्य देण्यात आले होते. त्यापैकी एक लाख ७४ हजार ५४२ क्विंटल धान्य नागरिकांनी घेतले. नियमित आणि केंद्र शासनाचे मिळून तीन लाख ८२ हजार १०८ क्विंटल धान्य नागरिकांसाठी देण्यात आले होते. त्यापैकी तीन लाख ६७ हजार ४५७ क्विंटल धान्य नागरिकांनी घेतल्याची माहिती पुरवठा शाखेने दिली.बायोमेट्रिकद्वारे धान्यवाटप शासनाकडून अंत्याेदय योजनेसाठी १० किलो गहू आणि २५ किलो तांदूळ तर प्राधान्य योजनेसाठी प्रतिसदस्य गहू दोन आणि तांदूळ तीन किलो मिळतो. काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक पद्धत लागू केली. शिधावाटप दुकानांत हे बायोमेट्रिक यंत्र बसविले. या पद्धतीने धान्य घेण्याचे प्रमाण ८५ टक्के वाढले. त्यामुळे लाभार्थ्यांना हिश्शाचे धान्य मिळत असल्याचे पुरवठा विभागाने सांगितले.टाळेबंदीच्या काळात नागरिकांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन शासनाने धान्यपुरवठा वाढविला होता. प्रथमच विक्रमी ९५ टक्के धान्यवाटप करण्यात आले.- रोशन कापसे, पुरवठा अधिकारी, वसई 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार