शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारच्या प्रभाग रचनेला उच्च न्यायालयात आव्हान, पालिकेच्या अडचणीत वाढ : निकालाकडे वसईकरांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 09:47 IST

सांगितले की, पालिका आयुक्त व निवडणूक आयोगाने गावकऱ्यांनी दाखल केलेल्या कुठल्याही सूचना व हरकती विचारात न घेतल्या नाहीत. पालिकेने निवडणूक आयोगाच्या साथीने दाखल १७ हरकतींपैकी एकमेव हरकत विचारात घेतल्याने पालिकेविरोधात न्यायालयाकडे दाद मागावी लागली.

आशीष राणेवसई : वसई-विरार महापालिकेच्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी व सप्टेंबरमध्ये प्रभाग रचनेसंदर्भात घेण्यात आलेल्या सूचना व हरकती पालिका व निवडणूक आयोगाने सपशेल फेटाळून लावल्या होत्या. याविरोधात काँग्रेसचे सरचिटणीस समीर वर्तक यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात या प्रभाग रचनेलाच आव्हान दिले आहे. या प्रकरणी  मुंबई उच्च न्यायालयाने प्रभाग रचनेबाबतीत पालिका प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. 

सांगितले की, पालिका आयुक्त व निवडणूक आयोगाने गावकऱ्यांनी दाखल केलेल्या कुठल्याही सूचना व हरकती विचारात न घेतल्या नाहीत. पालिकेने निवडणूक आयोगाच्या साथीने दाखल १७ हरकतींपैकी एकमेव हरकत विचारात घेतल्याने पालिकेविरोधात न्यायालयाकडे दाद मागावी लागली. १२ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात महापालिका प्रशासनाविरोधात दाखल केलेल्या या याचिकेवर १५ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली असता त्या वेळी उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला शनिवार दि. १७ ऑक्टोबरपर्यंत पालिकेच्या प्रभाग रचना प्रक्रियेसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले होते, मात्र पालिकेने हे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले की नाही याबाबत पालिका आयुक्त तथा प्रशासक गंगाथरन डी. यांना संपर्क केला असता तो न झाल्याने आयुक्तांची प्रतिक्रिया मिळाली नाही.

वसई-विरार महापालिकेने सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. २८ फेब्रुवारी रोजी ११५ प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर केली होती. त्यात ११५ पैकी २८ जागांवर महिलांसाठी आरक्षण आहे तर महापौरपद अनुसूचित जमातीसाठी आधीच नगरविकास खात्याकडून जाहीर झाले होते. त्यानंतर या प्रभाग रचनांसंदर्भात हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या, मात्र कोरोनामुळे टाळेबंदी सुरू झाली व पुढील सुनावणीच लांबणीवर पडली. अखेर टाळेबंदीत शिथिलता येताच ११ सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवली होती. यामध्ये एकूण १७ हरकती नोंदवल्या गेल्या होत्या. यात तयार करण्यात आलेली प्रभाग रचना मतदारांच्या दृष्टीने चुकीची आणि गैरसोयीची असल्याची हरकत पर्यावरण समितीचे समन्वयक समीर वर्तक यांनी घेतली होती, परंतु ती पालिका मुख्यालयात झालेल्या सुनावणीत फेटाळण्यात आली होती. 

- 115 प्रभागांसाठी आरक्षण सोडत- 28 जागांवर महिला आरक्षणवसई-विरार महापालिकेने सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. २८ फेब्रुवारी रोजी ११५ प्रभागांसाठी आरक्षण  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारHigh Courtउच्च न्यायालय