शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
"I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
5
बीएलएफने पाकिस्तानी सैन्यावर केला मोठा हल्ला; १० सैनिकांना मारल्याचा दावा
6
नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..."
7
Pranjal Dahiya : Video - "ओ काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची..."; गैरवर्तनावर भडकली प्रसिद्ध गायिका
8
Aquarius Yearly Horoscope 2026: कुंभ राशीसाठी नवीन वर्ष 2026: आर्थिक चणचण संपणार! प्रवासातून भाग्योदय आणि सुखद बातम्यांचे वर्ष
9
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
10
वाघ गावात शिरला, तरुणावर हल्ला केला अन् पलंगावर आरामात झोपी गेला, पाहा Video...
11
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
12
NMMC Election 2026: ...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
13
दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं?
14
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
15
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
16
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
17
चहा १० रुपये, वडापाव २० रुपये! विमानतळावर आता मिळणार रेल्वे दरात नाश्ता; कसा घ्यायचा लाभ?
18
मुंबईत मनसेमध्ये बंडखोरी, नाराज अनिशा माजगावकर यांनी प्रभाग क्र. ११४ मधून भरला अपक्ष उमेदवारी अर्ज 
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स
20
"धमक्या मिळाल्या आणि..." आमिर खानबद्दल भाचा इमरान खानचा खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

“बहुजन विकास आघाडीचा वसई-विरार निवडणुकीतही पराभव करू, आमचाच महापौर होईल”: स्नेहा दुबे पंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:08 IST

VVCMC Election 2026: आतापर्यंत सुमारे डझनभर बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आणखी अनेकांशी चर्चा सुरू आहे, असे स्नेहा दुबे पंडित यांनी म्हटले आहे.

VVCMC Election 2026: राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग येताना पाहायला मिळत आहे. वसई-विरार महानगरपालिकेतही जागावाटपावरून विरोधकांमध्ये बिनसल्याचे पाहायला मिळत असून, ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि मनसेने बहुजन विकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यातच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला पराभूत केल्यानंतर हीच लय कायम राखण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. तसेच वसई-विरार मनपात भाजपचा महापौर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 

विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर यांना पराभव पत्करावा लागला होता. यानंतर आता वसई-विरार महापालिकेची सत्ता राखण्याचे आव्हान हितेंद्र ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीसमोर असणार आहे. यातच ठाकरे गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला, तरी रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने बहुजन विकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे म्हटले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकूरांचे वर्चस्व खालसा करणाऱ्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी वसई विरार मनपा निवडणुकीतही भाजपा विजयी होईल, असे  म्हटले आहे.

बहुजन विकास आघाडीचा वसई-विरार निवडणुकीतही पराभव करू

स्थापनेपासून बहुजन विकास आघाडीने वसई-विरार महानगरपालिकेवर नियंत्रण आहे. परंतु, यावेळी आम्ही त्यांना येथेही पराभूत करू. भाजपाचा महापौर होईल. केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपाचे सरकार आहे. वसई विरारमध्ये आमदारही आमचेच आहेत. त्यामुळे महापौर आमच्या पक्षाचे असतील, तर विकास योजना अधिक वेगाने पुढे जाऊ शकतील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा पराभूत केल्यानंतर आता महापालिका निवडणुकीत भाजपा विजयी होईल, असे स्नेहा दुबे पंडित यांनी सांगितले.

दरम्यान, आतापर्यंत सुमारे डझनभर बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आणखी अनेकांशी चर्चा सुरू आहे. भाजपात आलेले नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते निवडणूक लढवण्याचा आग्रही नाहीत. मनपा निवडणुकांपूर्वी भाजपात प्रवेश केल्याने ते आनंदी आहेत, असा दावा स्नेहा दुबे पंडित यांनी केला आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP confident of winning Vasai-Virar election, aims for mayor post.

Web Summary : BJP aims to defeat Bahujan Vikas Aghadi in Vasai-Virar municipal elections. With support in state and center, BJP leader Sneha Dubey Pandit anticipates a BJP mayor, accelerating development. Many BVA members have joined BJP.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Vasai Virar Municipal Corporation Electionवसई विरार महानगरपालिका निवडणूक २०२६Vasai Virarवसई विरारBJPभाजपाHitendra Thakurहितेंद्र ठाकूर