शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

महिला आरक्षणाचा दिग्गजांना बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 11:48 PM

सोडत जाहीर; वसई-विरार महापालिका निवडणूक

वसई/विरार : बहुचर्चित वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शुक्रवारी विरारच्या भाऊसाहेब वर्तक सभागृहात आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये प्रस्थापित सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवक, सभापती ते आजी-माजी उपमहापौर, महापौर अशा अनेक दिग्गजांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आजी-माजी महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते यांसह अनेक ज्येष्ठ नगरसेवकांना पर्यायी प्रभागांचा शोध घ्यावा लागणार आहे.मागील महिनाभरापासून या आरक्षण सोडतीकडे सत्ताधारी बविआपासून सर्वच राजकीय पक्षांचे व इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले होते. यात बहु-सदस्यीय पद्धत रद्द झाल्यामुळे यापूर्वीची सोडत रद्द करावी लागली होती. अखेर २८ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता विरारच्या वर्तक सभागृहात जिल्हाधिकारी व आयुक्त डॉ. कैलास शिंदे व निवडणूक आयोगातर्फे पिठासीन अधिकारी जाधव यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.यापूर्वीच्या आरक्षणाच्या आधारावर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), पुरुष व महिला प्रभाग कोणते याचे आरक्षण काढण्यात आले. यात सर्व ११५ प्रभागांचे आरक्षण संगणकीय प्रणालीवर जाहीर करण्यात आले. आरक्षण जाहीर होणार असल्यामुळे वर्तक सभागृहामध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. कोणता प्रभाग आरक्षित होणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यान, विद्यमान महापौर प्रवीण शेट्टी, उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स यांचा प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाला आहे. बहुतांश पुरुष नगरसेवक असलेले प्रभाग या वेळी महिलांसाठी आरक्षित झाल्याने येथील दिग्गजांना फटका बसला आहे. नवघर-माणिकपूर शहरातील १० नगरसेवकांमध्ये विद्यमान नगरसेवक, सभापती व उपमहापौर असलेले प्रकाश रॉड्रिक्स, उमा पाटील, कल्पेश मानकर, सचिन घरत, फ्रँक डिसोझा यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. माजी महापौर प्रविणा हितेंद्र ठाकूर, किरण चेंदवणकर, मनीषा जाधव, वर्षा पाटील यांचे वॉर्ड सर्वसाधारण झाले आहेत. यामुळे आता विद्यमान महापौर व उपमहापौर या दोघांनाही नवीन प्रभाग शोधावा लागणार आहे.आरक्षित जागांची वॉर्डनिहाय माहितीखुला वर्ग- एकूण- ७४ प्रभाग१, १९, २८, ३७, ४६, ६४, ७३, ८२, ९१, १०९, २, २०, ३८, ४७, ५६, ९२, १०१, ३, २१, ३९, ५७, ६६, ८४, ९३, १११, ४, १३, २२, ४९, ५८, ६७, ७६, ८५, ९४, १०३, १४, ३२, ५०, ५९, ६८, ७७, ९५, १०४, ६, ३३, ६०, ६९, ७८, ८७, ९६, ११४, १६, २५, ४३, ५२, ६१, ९७, १०६, १७, ३५, ४४, ६२, ७१, ८०, ८९, ९८, ९, १८, २७, ३६, ४५, ५४, ७२ आणि ८१.एसटी- एकूण : ५७४, ७५, ८८, १०७ आणि ९०एससी-एकूण : ५२३, ११२, ४२, ७ आणि ७९ओबीसी- एकूण- ३११०, ११, १२, ५५, १००, २९, ६५, ८३, ११०, ३०, ४८, १०२, ३१, ४०, ५, ४१, ८६, ११३, १५, २४, ५१, १०५, ३४, ७०, ११५, ८, २६, ५३, ६३, ९९ आणि १०८.यांच्या आशा पल्लवित : माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम, सत्ताधारी बविआचे भरत गुप्ता, संदेश जाधव, विवेक पाटील, तसेच मागील वेळी प्रभाग आरक्षित झाल्याने शांत राहिलेली मंडळी आणि इच्छुक युवा अथवा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना, मनसे आदी पक्षातील मंडळींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारElectionनिवडणूक