लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा:वसई विरार महापालिका निवडणुकीत ५४७पैकी १५६ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील २१ उमेदवार हे 'रिक्षा' चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या उमेदवारांकडून गल्लीबोळात प्रचार करण्यासाठी रिक्षाचाच प्रामुख्याने वापर होत असल्याने रिक्षाचालकांना दिवसाचा रोजगार मिळत आहे.
प्रचारासाठी रिक्षांचा वापर
यंदा ४ सदस्यांचा मोठा प्रभाग आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि चारचाकी वाहन प्रत्येक गल्लीबोळात घेऊन जाणे शक्य नसते. त्यामुळे गल्लोगल्ली उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी रिक्षाला महत्त्व आले आहे. उमेदवार प्रचार करण्यासाठी रिक्षांचा वापर करत आहेत. वसई विरार मधील २५० हून अधिक रिक्षा या प्रचारासाठी विविध उमेदवारांनी भाड्याने घेतल्या असून, त्यातून प्रचार केला जात आहे. एका रिक्षाला दिवसाला ८०० ते १२०० भाडे दिले जात आहे. २१ अपक्ष उमेदवारांना चिन्हच रिक्षा मिळाल्याने ते तर प्रचारासाठी हमखास रिक्षाचा वापर करताना दिसत आहेत.
Web Summary : In Vasai-Virar, 21 independent candidates with 'rickshaw' symbols are campaigning using rickshaws. This provides daily income for many rickshaw drivers as candidates rent them for local area promotion, with over 250 rickshaws hired. Drivers earn ₹800-₹1200 daily.
Web Summary : वसई-विरार में, 'रिक्शा' चुनाव चिह्न वाले 21 निर्दलीय उम्मीदवार रिक्शा का उपयोग करके प्रचार कर रहे हैं। इससे कई रिक्शा चालकों को दैनिक आय मिल रही है क्योंकि उम्मीदवार स्थानीय क्षेत्र के प्रचार के लिए उन्हें किराए पर लेते हैं, 250 से अधिक रिक्शा किराए पर लिए गए हैं। चालकों को प्रतिदिन ₹800-₹1200 मिलते हैं।