लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराने स्वतःवर दाखल गुन्ह्यांची माहिती निवडणूक आयोगाला न दिल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी शिंदेसेनेचे उमेदवार यशोधन ठाकूर यांनी केली आहे.
वसई विरार पालिकेच्या प्रभाग क्रमांक २९ अ मधून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार अफिफ जमील शेख निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सत्य प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल गुन्ह्यांचे विवरण निरंक असे दिले आहे.
बविआचे उमेदवार अफिफ शेख यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी तक्रार दाखल
वास्तविक, पाहता काही दिवसांपूर्वीच वसई पोलिस ठाण्यात अफीफ शेख व त्यांचे वडील जमील शेख, तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यावर शासनाची फसवणूक करून बोगस दस्तावेज बनवून वसई पोलिस ठाण्याची जागा लाटल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शेख यांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकूर यांनी केली आहे.
प्रभाग २९ अ मध्ये ठाकूर विरुद्ध शेख
प्रभाग क्रमांक २९ मध्ये ठाकूर व शेख यांसह आठ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यशोधन ठाकूर हे यापूर्वी बविआचे कट्टर कार्यकर्ते होते. त्यांचे वडील नितीन ठाकूर भाजपमधून निवडणूक लढवीत आहेत. दोन्ही पिता-पुत्रांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
Web Summary : Shinde Sena demands disqualification of Bahujan Vikas Aghadi candidate Afif Sheikh for allegedly concealing criminal charges in his election affidavit. A complaint has been filed citing a case of land grabbing and fraudulent documents. Thakur and Sheikh are contesting from Ward 29A.
Web Summary : शिंदे सेना ने बहुजन विकास अघाड़ी के उम्मीदवार अफीफ शेख पर चुनावी हलफनामे में आपराधिक आरोप छिपाने का आरोप लगाते हुए अयोग्यता की मांग की है। भूमि हड़पने और धोखाधड़ी के दस्तावेजों का हवाला देते हुए शिकायत दर्ज की गई है। ठाकुर और शेख वार्ड 29ए से चुनाव लड़ रहे हैं।