शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरारच्या २९ हजार दुबार मतदारांचा लागेना थांगपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:05 IST

दुबार मतदान करणार नाही, ५ हजार मतदारांचे हमीपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : वसई-विरार महापालिका क्षेत्रात असलेल्या ५२ हजार दुबार मतदारांपैकी २९, १२७ मतदारांच्या रहिवासाचा पत्ता महापालिकेच्या पथकांना सापडलाच नाही. तर २३,२५२ मतदारांचा शोध पालिकेमार्फत घेण्यात आला आहे. यातील ५,१५८ मतदारांकडून दुबार मतदान करण्यात येणार नाही अशा आशयाचे हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे. तर उर्वरित मतदारांकडून मतदानाच्या दिवशीच हमीपत्र लिहून घेण्यात येणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे.

दुबार मतदारांबाबत संपूर्ण राज्यात अनेक आरोप-प्रत्यारोप झालेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने सुद्धा ही बाब गांभीर्याने घेतली. मतदार यादीमध्ये दुबार नाव असलेल्या प्रत्येक मतदारांच्या नावासमोर दोन स्टार दिले गेले आहेत. त्याचप्रमाणे दुबार मतदारांचा शोध घेऊन, कोणत्याही एकाच मतदान केंद्रावर मतदान करता येणार असून अशा प्रकारचे हमीपत्र त्यांच्याकडून लिहून घेतले आहे. ज्यांच्याकडून लिहून घेतले नसेल अशांसाठी मतदानाच्या दिवशीसुद्धा ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.

२९,१२७ मतदारांच्या रहिवासाचा पत्ता पालिकेच्या पथकांना सापडलाच नाही. २३,२५२ मतदारांचा शोध महापालिकेमार्फत घेण्यात आला आहे.

केंद्रावर लिहून घेणार हमीपत्र

- १ जुलै २०२५ पर्यंतच्या गृहित धरलेल्या विधानसभा मतदार यादीनुसार वसई-विरार महापालिका हद्दीत ११ लाख २६ हजार ४०० मतदार नोंद आहेत. यामध्ये ५२ हजार ३७९ मतदारांची नावे ही दुबार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

- त्यानंतर पालिकेने दुबार असलेल्या मतदारांकडून मतदान कुठे करणार? याबाबतचे हमीपत्र लिहून घेण्याची प्रक्रिया सुरू केली होती. दुबार मतदारांपैकी पालिकेला २३,२५२ - मतदारांचा पत्ता शोधण्यात यश आले.

- त्यापैकी केवळ ५,१५८  मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले. मात्र उर्वरित दुबार मतदारांकडून मतदानाच्या दिवशी त्याच केंद्रावर हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे, असे मनपाने सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Vasai-Virar: 29,000 Duplicate Voters' Addresses Remain Untraced by Authorities

Web Summary : Vasai-Virar authorities couldn't trace 29,127 duplicate voters. They located 23,252, securing declarations from 5,158 against double voting. Remaining voters will sign declarations on election day, per municipality officials.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Corporationनगर पालिकाVasai Virar Municipal Corporation Electionवसई विरार महानगरपालिका निवडणूक २०२६Vasai Virarवसई विरारElectionनिवडणूक 2026Votingमतदान