वसई-सावंतवाडी रेल्वेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:40 PM2019-03-11T22:40:16+5:302019-03-11T22:40:40+5:30

वसई ते सावंतवाडी रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी नुकतेच विरार पूर्व मनवेलपाडा येथे सह्यांची मोहीम राबवली गेली.

Vasai-Sawantwadi Railway's demand | वसई-सावंतवाडी रेल्वेची मागणी

वसई-सावंतवाडी रेल्वेची मागणी

googlenewsNext

वसई : वसई ते सावंतवाडी रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी नुकतेच विरार पूर्व मनवेलपाडा येथे सह्यांची मोहीम राबवली गेली. दिवसभरात सह्यांच्या मोहिमेला तीन हजार कोंकणी नागरिकांनी साथ देत प्रचंड प्रतिसाद दिला आहे. तर आठवड्याभरात तब्बल पाच हजार नागरिकांनी वसई- सावंतवाडी रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी सह्यांद्वारे पाठींबा दर्शविला आहे.

तालुक्यात व परिसरातील शहरात मोठ्या प्रमाणात कोकणी- मालवणी चाकरमानी वास्तव्य करतात. या चाकरमान्यांना वर्षाभरातील सण- उत्सव- समारंभ निमित्ताने गावी जाण्यासाठी दादर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या रेल्वे स्टेशन वरून ट्रेन पकडावी लागते.
विरार- वसई वरून दादर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनला आपल्या कुटूंबासह सामान घेऊन प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत असल्यामुळे वसई ते सावंतवाडी रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. याचा फायदा डहाणू ते नायगाव येथील लाखो कोकणवासीयांना होणार आहे. गेल्या दोन आठवड्यात वसई ते सावंतवाडी रेल्वेसेवा सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला.
सुरवातीला वैयिक्तक स्थरावर नंतर सामुहिकरित्या बैठका- सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. कोंकणी जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दाखिवल्यामुळे वसई- सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने सह्यांची मोहीम हाती घेतली. नुकतीच विरार पूर्व मधील मनवेलपाडा तलावाजवळ सह्यांची मोहीम पार पडली. दिवसभरात या मोहिमेला तब्बल तीन हजार कोकणी चाकरमान्यानी पाठिंबा दिला असल्याचे संघटनेचे समन्वयक शैलेश मराठे यांनी सांगितले. तरी ज्या कोंकणी रहिवाश्यांना या मोहिमेत भाग घ्यायचा आहे त्यांनी शैलेश रामचंद्र मराठ, यशवंत देऊ जडयार, गजानन रमेश हरयाण, सुदर्शन शांताराम जाधवयांना संपर्क साधावा.

५ हजार सह्यांद्वारे पाठिंबा
आतापर्यत वसई- नालासोपारा- विरार व परिसरातील शहरामधील पाच हजार कोकणी- मालवणी रहिवाश्यांनी वसई ते सावंतवाडी रेल्वेसेवा सुरू यासाठी सह्यांद्वारे पाठींबा दर्शविली आहे. येत्या काही दिवसात संपुर्ण पालघर जिल्ह्यामध्ये तसेच मुंबई उपनगरात सह्यांची मोहीम राबविणार आहोत

Web Title: Vasai-Sawantwadi Railway's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.