वसईफाटा मार्ग फेरीवाल्यांच्या विळख्यात
By Admin | Updated: January 9, 2016 01:53 IST2016-01-09T01:53:38+5:302016-01-09T01:53:38+5:30
वसईफाटा येथील वसईकडे जाणाऱ्या व वसईहून येणाऱ्या दुतर्फा मार्गावर भाजीपाला विक्रेते, फेरीवाले, फळविक्रेते यांनी अतिक्रमण केल्याने सायंकाळी या ठिकाणी

वसईफाटा मार्ग फेरीवाल्यांच्या विळख्यात
पारोळ : वसईफाटा येथील वसईकडे जाणाऱ्या व वसईहून येणाऱ्या दुतर्फा मार्गावर भाजीपाला विक्रेते, फेरीवाले, फळविक्रेते यांनी अतिक्रमण केल्याने सायंकाळी या ठिकाणी वाहनांसाठी मोकळा मार्ग मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊन या कोंडीचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
वसईफाटा येथील उड्डाणपुलाच्या गाळ्यामध्येही काही फेरीवाले आपल्या हातगाड्या थाटत असल्याने व काही वाहने परवानगी नसतानाही या ठिकाणी उभी ठेवत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. वाहतूक दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या बाबींकडे संबंधित असणाऱ्या प्रशासकीय यंत्रणा काणाडोळा करीत आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना याचा फटका बसत आहे. याबाबत, ठेकेदार कंपनी आयआरबी यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता याबाबत महामार्ग प्रशासनाने पोलीस यंत्रणेकडे नोटीस दिली असून या असणाऱ्या फेरीवाल्यांवर लवकरच कारवाई होणार असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)