शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
3
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
4
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
5
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
6
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
7
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
8
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
9
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
10
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
11
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
12
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
13
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
14
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
15
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
16
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
17
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
18
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
19
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
20
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...

वसई,भाईदर पोलीस आयुक्तालय होणार; १५ ऑगस्टला घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 22:45 IST

ठाणे, पालघरमधील अनेक अधिकारी, पोलीस होणार वर्ग

नालासोपारा : वसई विरार मीरा भाईंदर शहराचे मिळून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय १५ ऑगस्टला स्थापन केले जाणार असून त्याला वसई भाईंदर आयुक्तालय असे नाव देण्याचेही ठरले आहे. पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून वसई विभागाला वगळण्यात येणार आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून हालचालींना वेग आला आहे. १५ ऑगस्टला त्याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. आयुक्त म्हणून बिपीन सिंग आणि प्रशांत बुरुडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

वसई तालुक्यात व विशेषता नालासोपारा भागातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच शहरी भागातील कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी वसई- विरार तसेच मीरा- भाईंदर या भागासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा प्रस्ताव सन २०१५-१६ च्या दरम्यान देण्यात आला होता. यादृष्टीने अनेक बैठका होऊन स्वतंत्र आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आला होता. सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांपैकी सुमारे ७० टक्के गुन्हे वसई विभागात घडत असल्याने पालघरचे पोलीस अधीक्षक ह्यांचे वसई विभागाकडे जास्त लक्ष असते.

वसई- विरार, मीरा- भाईंदर येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करताना २६ पोलीस ठाणे उभारण्याची संकल्पना आहे. नव्याने उभारण्यात येणाºया आयुक्तालयात १ आयुक्त, १ अप्पर आयुक्त, पाच उपायुक्त, १२ सहायक पोलिस आयुक्त, ७२ पोलीस निरीक्षक, १०८ सहायक पोलिस निरीक्षक, २२३ पोलीस उपनिरीक्षक अशी नेमणूक होणार असून प्रत्येक सहाय्यक आयुक्तांच्या अखत्यारीत एक किंवा दोन, पोलीस स्टेशन देण्याची योजना तयार करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातून ९८७ अधिकारी आणि पोलीस तर पालघर जिल्ह्यातून ११४७ अधिकारी आणि पोलीस नवीन आयुक्तालयात वर्ग करण्यात येणार आहे. गोंदिया आणि गडचिरोली विभागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने तोही नवीन आयुक्तालयात वर्ग केला जाणार असल्याचेही कळते. नवीन आयुक्तालय सुरू करण्यासाठी सुधारित आकृतीबंधाच्या कामकाजासाठीचे घटकनिहाय वेळापत्रक धोरण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक एस जगन्नाथन यांनी २० जुलैला काढले आहे.

सध्या पालघर जिल्ह्यात २३ पोलीस स्टेशन व ७ उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालये असून नवीन आयुक्तालय झाल्यास संपूर्ण वसई विभाग हा पोलिस प्रशासनाच्या दृष्टीने पालघर जिल्ह्यापासून विभक्त करण्यात येणार आहे. वसई तालुक्यातील वेगवेगळ्या पोलिस स्थानकांमध्ये असलेल्या गुन्हेगारीचे तपशील सध्या अभ्यासले जात असून नव्या पोलीस स्थानकांच्या निर्मितीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे पालघर येथील पोलीस अधिकारी यांनी सांगितले. ठाणे ग्रामीण व पालघर जिल्हा पेक्षा मोठ्या स्वरूपाचे वसई, मिरा- भाईदर आयुक्तालय स्थापन होणार आहे. या दोन्ही भागातील पोलीस कर्मचाऱ्यांना आयुक्तालय क्षेत्रांमध्ये स्थलांतरित होण्यासाठी विकल्प देण्यात येणार असून रिक्त होणाºया पदांसाठी पालघर जिल्ह्यात नव्याने पोलीस भरती केली जाणार आहे.

पुर्वी भाईंदर ते डहाणू पर्यत सागरी आयुक्तालय स्थापन करावे असा प्रस्ताव गृहविभागाकडे पाठविण्यात आला होता. मात्र भौगोलिक अडचणींच्या दृष्टीने तो सोयीस्कर नसल्याने बारगळला. पालघरच्या तत्कालीन पोलीस अधीक्षिका शारदा राऊत यांनी मीरा भार्इंदरसह वसई विरार शहराचे पोलीस आयुक्तालय बनविण्याचा प्रस्ताव सादर केला होता. हे दोन्ही भाग रेल्वेने जोडले गेलेले असून रस्ते मार्गाने देखील सोयीस्कर आहेत. दोन्ही लगतचे शहरी भाग असल्याने एकसंघ आयुक्तालय प्रशासनिक आणि व्यावहारिक दृष्टीने अधिक सोयीस्कर ठरणार आहे. आता नवीन आयुक्तालय स्थापन होणार असल्याने वसईतील पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आम्ही यापूर्वी वसईत तीन स्वतंत्र पोलीस ठाण्यांची मागणी करून प्रस्ताव दिले होते. आता आयुक्तालय झाल्यावर बारा सहपोलीस आयुक्त मिळतील आणि कायदा सुव्यवस्था अधिक चांगली ठेवता येईल अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे.मिरा-भाईंदर-वसई-विरार परिसरातील वाढत्या लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात सुरिक्षतता देण्यासह कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी या परिसरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

१७५ कोटींच्या निधसही मिळाली मंजूरीनवीन आयुक्तालयांतर्गत ४७०८ पदे असतील. त्यासाठी ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील १००६, पालघर कार्यक्षेत्रातील ११६५ आणि इतर पोलीस घटकांतून ३१७ अशी एकूण २४८८ पदे वर्ग करण्यात येणार आहेत. तसेच विविध संवर्गातील २२२० पदांची नव्याने निर्मिती करण्यात येणार आहे. या नवनिर्मित पोलीस आयुक्तालयांतर्गत येणारे कार्यक्षेत्र अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखाली राहणार आहे. पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीसाठी आवश्यक पदनिर्मिती, वाहने आणि पोलीस ठाण्यांची निर्मिती यासाठी लागणाºया १३० कोटी ९९ लाख ५८ हजार २३ इतक्या आवर्ती आणि ४३ कोटी ७९ लाख ३० हजार ५३२ इतक्या अनावर्ती खर्चासही मंजुरी देण्यात आली.

टॅग्स :Policeपोलिस