वसई कला-क्रीडा महोत्सव काेराेनामुळे पुढे ढकलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 00:01 IST2020-12-23T23:55:37+5:302020-12-24T00:01:39+5:30
Vasai : मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. या सभेला वनमाळी, संघटक सचिव संताेष वळवईकर, सचिव केवल वर्तक, अनिल वाझ, विजय चाैधरी आदी उपस्थित हाेते.

वसई कला-क्रीडा महोत्सव काेराेनामुळे पुढे ढकलला
वसई : वसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळातर्फे दरवर्षी हाेणारा कला-क्रीडा महोत्सव यंदा काेराेनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी ‘लाेकमत’ला दिली. मात्र, नाताळच्या पार्श्वभूमीवर ‘फिटनेस रन’चे आयाेजन करण्यात आले आहे.
मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. या सभेला वनमाळी, संघटक सचिव संताेष वळवईकर, सचिव केवल वर्तक, अनिल वाझ, विजय चाैधरी आदी उपस्थित हाेते. दरम्यान, २५ डिसेंबरला ४ वाजता नाताळ सणाचे औचित्य साधून ‘फिटनेस रन’चे आयाेजन करण्यात येणार आहे. यामध्ये निवडक १० मॅरेथाॅनपटू सहभागी हाेणार आहेत. सायंकाळी ६.१५ वाजता या फिटनेस रनची सांगता हाेणार आहे. तत्पूर्वी, नरवीर चिमाजी आप्पा मैदानावरील क्रीडा ज्याेतीचे प्रज्वलन व न्यू इंग्लिश स्कूल येथील दीप प्रज्वलन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते हाेणार आहे. या कार्यक्रमाला आ. क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील आणि माजी महापाैर राजीव पाटील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे वसईकरांना यंदा
या महाेत्सवाचा आनंद लुटता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.