शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

वसई आगाराचा भोंगळ कारभार, प्रवाशांना ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 00:42 IST

कामाचे योग्य नियोजन आणि त्यात हवा तसा समन्वय नसल्याने वसई-नवघर बस आगाराच्या भोंगळ कारभाराने सामान्य प्रवासी त्रस्त झाले आहेत.

पारोळ : कामाचे योग्य नियोजन आणि त्यात हवा तसा समन्वय नसल्याने वसई-नवघर बस आगाराच्या भोंगळ कारभाराने सामान्य प्रवासी त्रस्त झाले आहेत. वसई आगारातून लांब पल्ल्यासाठी सोडण्यात येणाऱ्या बस प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक रद्द केल्या जात असल्याने प्रवाशांना मनस्ताप भोगावा लागत आहे. प्रवासी घटल्याची आवई उठवणाºया वसई आगाराच्या कामातच सातत्य नसल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.वसई पूर्व ग्रामीण भाग हा दुर्गम आहे. जंगलाच्या दिशेने राहणाºया व कामासाठी शहरात येणाºया प्रवाशांना एसटी फायदेशीर आहे. मात्र याच लांबपल्ल्याच्या बस प्रवाशांच्या भावनांशी देणेघेणे न ठेवता अचानक रद्द केल्या जात असल्याने सामान्य प्रवाशांना कपाळाला हात लावण्याशिवाय पर्याय उरत नाही. वसई-नवघर आगारातील कर्मचारी यापुढे सुधारतील अशी आशा असून तसे झाले नाही तर त्यांना प्रवाशांच्या संतापाचा सामना करावा लागेल, अशा इशारा प्रवाशांनी दिला आहे.वसई व नवघर हे दोन आगार एकमेकांना संलग्न आहेत. वसई आगारातूनच वाहक-चालकांच्या ड्युटी निश्चित केल्या जातात. आता नवघर आगारातून सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास वसईपासून सुमारे ५० ते ५५ किलोमीटर लांब असलेल्या पालसई गावाकरिता नाईट शिफ्टसाठी सोडली जाणारी पालसई ही बस आहे. या बसचा फायदा जंगलाच्या दिशेने एकही प्रवासी वाहन जाऊ शकत नाही अशा नांदणी, अंबरभुई, पालसई व परिसरातील काही आदिवासी गावपाड्यांना होतो. भाजीपाला विकण्यासाठी आदिवासी महिला वसई शहरात येतात. पालसई बस एक दिवसाआड रद्द केली जात असल्याने पर्यायी वाहनांचा अवलंब करत घर गाठावे लागते. ही बस रद्द झाल्याने बसने २ तासांचा प्रवास असतो तो ३ ते ४ तासांवर जातो. नवघर आगारातून सुटणाºया आवंढे, घोडमाळ या लांब पल्ल्याच्या बसचीही वरीलप्रमाणेच अवस्था आहे. त्याही कधीकधी अचानक रद्द केल्या जातात.वज्रेश्वरी बस कायमस्वरुपी बंदनवघर आगारातून पूर्वी साडेआठ वाजता सोडली जाणारी वज्रेश्वरी बस आगार व्यवस्थापकांनी कायमस्वरूपी बंद केली आहे. प्रवासी नाहीत असे कारण देत ही बससेवा बंद केली. परंतु आगाराचे हे उत्तर साफ खोटे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. वज्रेश्वरी हे तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी जाणाºया भाविकांची तसेच या ठिकाणाहून वसई-मुंबईच्या दिशेने रोज प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या मोठी आहे. साडेआठची बस रद्द केल्याने आगारातून सायंकाळी ६.१० वाजता सुटणारी पालसई, संध्याकाळी ६.३५ वाजता सुटणारी खंबाळा आणि रात्री ७.३५ वाजता सुटणाºया चांबळा बसवर मोठा ताण येतो. कधीकधी यापैकी एखादी बस रद्द केली तर प्रवाशांची मोठी गैरसोय होते.आगार व्यवस्थापकांनी वेळीच आपले वर्तन सुधारावे अन्यथा त्यांना प्रवाशांच्या संतापाला सामोरे जावे लागेल व लांब पल्ल्याच्या बस रद्द न करता त्या पुन्हा कायमस्वरूपी सुरळीत करण्यात याव्यात. - संदेश भोईर, प्रवाशीप्रसंगी पायी जाण्याची येते वेळरात्री ८.०० आणि ८.२० वाजता सुटणाºया करंजोण आणि कळंभोण या बस तर कोणतीही अडचण नसताना अचानक रद्द केल्या जातात. मागील आठवडाभरापासून या दोनपैकी एक बस रद्दच केली आहे. करंजोण आणि कळंभोण या दोन्ही गावात रात्री ८ नंतर प्रवासी वाहने जायची बंद होतात. त्यामुळे वाहन नसल्याने भाजीपाला विकण्यासाठी येणाºया आदिवासी महिला, औद्योगिक वसाहतीत कामासाठी येणाºया प्रवाशांना पायी धोकादायक प्रवास करावा लागतो.

टॅग्स :state transportएसटीVasai Virarवसई विरार