वैतरणा पूूल ‘रामभरोसे’

By Admin | Updated: October 27, 2016 03:37 IST2016-10-27T03:37:56+5:302016-10-27T03:37:56+5:30

महाडच्या सावित्री नदीवरील धोकादायक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सर्वच जुन्या व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते.

Vaitarna Pulle 'Ram Bharose' | वैतरणा पूूल ‘रामभरोसे’

वैतरणा पूूल ‘रामभरोसे’

- हितेन नाईक,  पालघर
महाडच्या सावित्री नदीवरील धोकादायक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर सर्वच जुन्या व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. मुंबई-गुजरातला जोडणारा ब्रिटिशकालीन वैतरणा पूलाचे शेवटचे स्ट्रकचरल आॅडिट कधी झालेय याची माहितीच पश्चिम रेल्वे प्रशासना कडे उपलब्ध नसल्याने महाड च्या दुर्घटने नंतर तात्काळ आॅडिट होणे गरजेचे असताना रेल्वे प्रशासन त्या दृष्टीने पावले उचलत नसल्याने प्रवाशांच्या सुरिक्षततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन किती बेफिकीरिने वागत आहे हे दिसून येत आहे.
मुंबई-गुजरात-दिल्ली आदी राज्यांना जोडणारा सफाळे-वैतरणा पूल पश्चिम रेल्वे साठी एक महत्त्वपूर्ण दुवा आहे.ब्रिटिशकालीन काळात सुमारे शंभर वर्षांपूर्वी बांधलेल्या या ९२ व ९३ क्र मांकाच्या पुलाची उन्हातान्हात समुद्राच्या लाटाचा मारा आणि पुलावरून होणारी रोजची वाहतुकीच्या भारा मुळे धोकादायक अवस्था झाली आहे. ह्या पुलांच्या बांधकामातील लोखंडी साहित्य गंजून गेले असून धोकादायक अवस्थेतील या पुलांचे आयुष्यमान कमी असल्याने रेल्वे प्रशासनाने सात वर्षा पूर्वी पासून नवीन रेल्वे पूल उभारणीचे काम हाती घेतले आहे.मात्र रेल्वे आणि ठेकेदारा मध्ये समन्वयाचा अभाव असल्याने रेल्वे पूल उभारणीचे काम जवळपास बंद पडले आहे.
पालघर-डहाणूला उपनगरीय दर्जा प्राप्त झाल्या नंतर लोकल वाहतूक सुरु झाली असून लाखो प्रवासी या मार्गावरून प्रवास करीत आहेत. अशा वेळी नवीन पूल उभारणी ला मोठी दिरंगाई होत असल्याने आणि या पुला जवळूनच मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन होत असल्याने प्रवाशांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. महाड मध्ये झालेल्या दुर्घटने नंतर या पूल उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरु करणे अत्यावश्यक असताना त्या नवीन पुलाच्या उभारणीचे काम बंद पडत असल्यास प्रवाशांच्या जीविताचे गांभीर्य रेल्वे प्रशासनाला किती आहे हे दिसून येत असल्याचे राहुल तोडणकर या प्रवाशाने सांगितले. रोजची वाहतूक पहाता एक दिवस मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागेल असे चित्र आहे.

माहितीच्या अधिकारामध्ये धक्कादायक वास्तव
- पालघर जिल्हा निर्मिती नंतर नागरीकरणाचा ओघ दिवसेंदिवस वाढत असून मेल, एक्स्प्रेस, शटल, मेमु द्वारे लाखो प्रवासी दररोज प्रवास करीत असतात. तसेच अवजड माल वाहतूकही सुरु असल्याने हा जीर्ण झालेला पूल किती वेळ ह्या वाहतुकीचा भर सांभाळू शकेल हा प्रश्न उपस्थित झाल्या नंतर डहाणू-वैतरणा प्रवासी संघटनेचे सदस्य आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रथमेश प्रभुतेंडोलकर ह्यांनी पश्चिम रेल्वे प्रशासना कडे माहितीच्या अधिकारात माहिती मागविली होती.
या अर्जाला सफाळे-वैतरणा दरम्यानच्या दोन्ही पुलाच्या स्ट्रक्चरलं आॅडिट कधी झाली आहे. ह्या बाबत माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर प्रथमेश ह्यांना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे या पुलाला धोका निर्माण झाल्या नंतर मोठा मेगाब्लॉक घेऊन थोडीशी दुरु स्ती करण्यात आली होती. परंतु रेल्वे पुलाच्या पूर्वे कडील भराव हि खचत असल्याच्या घटना नेहमी समोर येत आहेत.
या दोन्ही पुलांचे स्ट्रक्चरलं आॅडिट तात्काळ करणे अत्यावश्यक बाब असताना अजूनही त्याबाबत रेल्वे प्रशासन ढिम्म बसली असल्याने रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या जीविताशी जीवघेणा खेळ खेळत असून त्यांना कुठलेही गाम्भीर्य दिसून येत नसल्याचे दिसून येत नसल्याने दैनंदिन प्रवाशांमधून तीव्र प्रतिक्रि या उमटत आहेत.

Web Title: Vaitarna Pulle 'Ram Bharose'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.