भारतरत्न आंबेडकरांच्या जयघोषाने वसई दुमदुमली
By Admin | Updated: April 15, 2016 01:12 IST2016-04-15T01:12:15+5:302016-04-15T01:12:15+5:30
बुधवारच्या मध्यरात्री बारा वाजता फटाक्यांची आतषबाजी करीत आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती सोहळ््याला उत्साहाने सुुरुवात झाली. गुरुवारी शहरात निळे झेंडे फडकवत निघालेल्या

भारतरत्न आंबेडकरांच्या जयघोषाने वसई दुमदुमली
वसई : बुधवारच्या मध्यरात्री बारा वाजता फटाक्यांची आतषबाजी करीत आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती सोहळ््याला उत्साहाने सुुरुवात झाली. गुरुवारी शहरात निळे झेंडे फडकवत निघालेल्या मोटार सायकल रॅली, ढोल-ताशाच्या गजरात नाचत-गाजत निघालेल्या मिरवणुका आणि बाबासाहेबांच्या जयघोषाने वसई दुमदुमली होती. आंबेडकर अनुयायानी सकाळी स्थानिक बुद्धविहारांमध्ये जाऊन अभिवादन केले.
वसई विरार महापालिकेने प्रथमच एक तालुका एक जयंती ही संकल्पना मांडून आंबेडकर जयंती साजरी करण्याचा केलेला प्रयत्न बऱ्याच अंशी यशस्वी झाल्याचे दिसून आले. त्यासाठी पालिकेने विविध संघटना आणि पक्षांना एकत्रित करून •भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समितीची स्थापना केली होती. समितीच्या माध्यमातून दोन दिवस जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी पालिकेने समितीला ३५ लाख रुपयांचा निधीही दिला होता. बुधवारी नालासोपारा येथील शूर्पारक नगरीत महापौर प्रवीणा ठाकूर यांच्या हस्ते उत्सवाला सुरुवात झाली.
(वार्ताहर)