वैष्णव कंपनी बंद, शंभर बेरोजगार

By Admin | Updated: July 13, 2016 01:42 IST2016-07-13T01:42:45+5:302016-07-13T01:42:45+5:30

सोमवारी झालेल्या अतिवृष्टीत वाडा तालुक्यातील अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. अबिटघर येथील वैष्णव कंपनीत एका नाल्याचे पाणी कंपनीत घुसल्याने

Vaishnav Company closed, one hundred unemployed | वैष्णव कंपनी बंद, शंभर बेरोजगार

वैष्णव कंपनी बंद, शंभर बेरोजगार

वाडा : सोमवारी झालेल्या अतिवृष्टीत वाडा तालुक्यातील अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. अबिटघर येथील वैष्णव कंपनीत एका नाल्याचे पाणी कंपनीत घुसल्याने या कंपनीतील जवळपास ३० इलेक्ट्रीक मोटारी चार तास पाण्याखाली गेल्या होत्या या कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.
श्री वैष्णव वायर अ‍ॅन्ड रोप्स प्रा.लि. ही कंपनी गेल्या अनेक वर्षापासून अबिटघर येथे कार्यरत आहे. सोमवारी ११ जूलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत येथील एका नाल्याला आलेल्या पुरामूळे कंपनीची संरक्षक भिंत तुटली व या नाल्याचे पाणी कंपनीत शिरले. तीन ते चार फूट उंचीपर्यंत कंपनीत पाणी झाल्याने कंपनीतील ३० इलेक्ट्रीक मोटारी पाण्याखाली गेल्या इलेक्ट्रीक भट्टी, इलेक्ट्रीक पॅनल, अशा अनेक वस्तू पाण्यात बुडाल्याने कंपनीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. कंपनीचे उत्पादन बंद पडल्यामुळे तिचे शंभरहून अधिक कामगार बेरोजगार झाले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Vaishnav Company closed, one hundred unemployed