शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

विनामास्क फेरीवाले, नागरिकांमुळे वसई-विरारमध्ये दुसऱ्या लाटेची भीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 09:28 IST

दहा महिन्यांपासून ठप्प असलेली रेल्वेसेवा, ठप्प असलेल्या बाजारपेठा आता सुरू झालेल्या आहेत. सर्व काही सुरू झाल्यानंतर कोरोनाला पुन्हा एकदा आमंत्रण दिले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता अजूनही वसई-विरारमधील भीती संपलेली नाही.

पारोळ : वसई-विरारमधील कोरोनाविरोधातील लढाई अद्याप संपलेली नाही. त्यामुळे कोरोनाचे भय संपवण्यासाठी निदान आणखी काही काळ वसईकरांना या महामारीविरोधात लढायचे आहे. दिवाळीनंतर कोरोनाचा आलेख झपाट्याने खाली आल्यानंतर आपण कोरोनाला हरवले, असा नागरिकांचा समज होणे हीच खरी बेफिकिरी ठरली आहे. दरम्यान, विनामास्क फेरीवाले आणि काही नागरिकांच्या बेफिकिरीमुळे दिवसेंदिवस वसई-विरार महापालिकेमध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे.दहा महिन्यांपासून ठप्प असलेली रेल्वेसेवा, ठप्प असलेल्या बाजारपेठा आता सुरू झालेल्या आहेत. सर्व काही सुरू झाल्यानंतर कोरोनाला पुन्हा एकदा आमंत्रण दिले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता अजूनही वसई-विरारमधील भीती संपलेली नाही. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ज्या आर्थिक अडचणींना वसईकरांना सामोरे जावे लागले, त्या व्यथा पुन्हा कोरोनाच्या निमित्ताने उफाळून वर येतात की काय, अशी भीती हातावर पोट असलेल्या अनेकांच्या मनात उमटू लागली आहे. यात कोरोनाला आमंत्रण देण्यासाठी विनामास्क भटकणारे नागरिक आणि फेरीवाले यांचे योगदान मोठे असणार आहे.वसई-विरार पालिका परिसरात फेरीवाल्यांनी पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. फेरीवाले कोरोना नियमांचे पालन करीत नसल्याने तसेच नागरिकदेखील बेफिकीरपणे वागत असल्याने कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत आहे. पोलीस आणि महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांच्या सुळसुळाटावर लक्ष केंद्रित करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.वसई पालिका हद्दीत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी ४० नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या ४३४ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. पालिका हद्दीत पुन्हा परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. फेरीवाल्यांचा तसेच नागरिकांचा विनामास्क वावर असल्याने कोरोनाचा धोका वाढत आहे. 

आर्थिक संबंधांमुळे कारवाई नाही?- काही पालिका अधिकारी-कर्मचारी आर्थिक संबंधांमुळे या फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई करीत नसल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. - सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येते. वसईत आठवडा बाजारांत होत असलेली गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा उडत असलेला फज्जा यामुळे कोरोनाला आमंत्रणच मिळत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याVasai Virarवसई विरार