शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनला यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 18:48 IST

दुचाकी चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनला यश आले आहे. 

(मंगेश कराळे) नालासोपारा : गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलीस अधिकारी आणि त्यांच्या टीमने दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला पकडून त्यांच्याकडून १३ गुन्ह्यांची उघड करून बारा चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्याची माहिती बुधवारी पत्रकार परिषदेत गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली आहे.

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयांच्या स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने त्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी दुचाकी चोरींचा आढावा घेवून दुचाकी चोरणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्ह्यांचा उलगडा करण्याचे आदेश दिलेले आहे. गुन्हे दोनच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुचाकी चोरी झालेल्या ठिकाणांना भेट देऊन घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्यावर अथक परिश्रम घेऊन अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती मिळवली. 

आरोपी आनंद ओझा (२५) आणि एक १६ वर्षीय अल्पवयीन आरोपी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी विरार, वालीव, आचोळे, माणिकपूर, काशीमिरा, दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १२ दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. चोरीच्या दुचाकी गुजरात राज्यातील सोनगड याठिकाणी विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर धीरज ओझा (२१) आणि कौशिक मराठे (२०) यादोघांना सोनगड येथून ताब्यात घेतले. आरोपींकडून ७ लाख ५५ हजारांच्या १२ दुचाकी जप्त केल्या आहेत. 

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वसई युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवले, पोलीस हवालदार चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, सुधीर नरळे, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे यांनी केली आहे.

 

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराPoliceपोलिसtheftचोरी