पॉवरटिलरमध्ये अडकून शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू
By Admin | Updated: November 7, 2016 16:11 IST2016-11-07T16:12:55+5:302016-11-07T16:11:23+5:30
पालघरमध्ये पॉवरटिलरमध्ये अडकून शेतकरी गणेश कोरडा यांचा मृत्यू झाला.

पॉवरटिलरमध्ये अडकून शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू
>पालघर, दि. 7 - तलासरी तालुक्यातील नांगरीपाडा येथील शेतकरी गणेश कोरडा पॉवरटिलर या कुदळीयंत्रात अडकून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शेत नांगरत असताना ही घटना घडली आहे. या यंत्रात त्यांचा पाय अडकल्याने गणेश यांचे संपूर्ण शरीर पॉवरटिलरमध्ये खेचले गेले.
या घटनेमुळे कोरडा कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पॉवरटिलरच्या सहाय्याने शेताची उखळणी करत असताना, यंत्राचा नांगर दगडावर आदळल्याने गणेश यांचा तोल जाऊन पाय नांगरात अडकला.
यावेळी कुदळीयंत्र तसेच सुरू राहिल्याने त्यांचे संपूर्ण शरीर यंत्रात ओढले गेले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान, घोलवड पोलिसांनी घटनास्थळावरुन गणेश कोरडा यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.