वसईत पाण्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2024 19:11 IST2024-06-15T19:10:30+5:302024-06-15T19:11:10+5:30
वसईच्या हवाईपाडा येथील शनिवारी दुपारची घटना

वसईत पाण्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- वसईत पाण्यात बुडाल्याने १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. हवाईपाडा परिसरात असलेल्या मानवनिर्मित तलावात घटना घडल्याचे वालीव पोलिसांनी सांगितले आहे.
दुपारच्या वेळी ५ मूले पोहण्यासाठी गेल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून कळते. यातील दोन मुलांचे मृतदेह सापडले असून तीन बेपत्ता मुलांचा शोध घेत आहे. घटनास्थळी वालीव पोलीस आणि मनपाचे अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी पोहचले आहेत. संतोष भवनच्या रशीद कंपाऊंडमधील जटाशंकर यादव चाळीत राहणाऱ्या अमित सूर्यवंशी (१२) आणि संतोष भवनच्या स्वामी विवेकानंद शाळेच्या पाठीमागे राहणाऱ्या अभिषेक शर्मा (१२) या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी लोकमतला सांगितले.