शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तारापूर येथे कंपनीतील स्फोटात दोघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 06:47 IST

पाच कामगार जखमी : अग्निशमन दलाने दोन तासांत मिळविले आगीवर नियंत्रण

ठळक मुद्देप्लॉट नंबर जे १/१ मधील जकारिया इंडस्ट्रीज या  कपड्यावर प्रोसेस करणाऱ्या टेक्स्टाइल कारखान्यातील थर्मोपॅक विभागात पहाटे ५.४०च्या दरम्यान झालेल्या भीषण स्फोटाचा आवाज पाच किमीपर्यंत आला

लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर एमआयडीसीतील एका टेक्सटाइल कंपनीत शनिवारी पहाटे भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत दोन कामगार जागीच ठार झाले, तर पाच जण जखमी झाले आहेत. एक कामगार गंभीर असून, त्याला वसई येथील रुग्णालयात दाखल केले आहे. उर्वरित कामगारांवर बोईसर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

प्लॉट नंबर जे १/१ मधील जकारिया इंडस्ट्रीज या  कपड्यावर प्रोसेस करणाऱ्या टेक्स्टाइल कारखान्यातील थर्मोपॅक विभागात पहाटे ५.४०च्या दरम्यान झालेल्या भीषण स्फोटाचा आवाज पाच किमीपर्यंत आला. या स्फोटामुळे कारखान्यात काचा व पत्र्याचा खच पडून थर्मोपॅक विभागातील मशिनरीचा चक्काचूर झाला असून, तारापूर अग्निशमन दलाने दोन तासांत आग नियंत्रणात आणली, तरीही दुपारपर्यंत आग धुमसत होती. आगीत मिथिलेश राजवंशी (३८) हा कामगार पूर्णपणे जळून त्याच्या शरीराचा कोळसा झाला होता, तर छोटेलाल सरोज (३७) याचा मृतदेह साडेचारच्या दरम्यान मिळाला. सरोज याचा मृतदेह मिळत नव्हता, म्हणून या दोघा कामगारांपैकी निश्चित कोणाचा मृत्यू झाला आणि कोण बेपत्ता आहे, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. त्यामुळे बेपत्ता कामगाराची शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू होती, तर या गोंधळाच्या परिस्थितीमुळे कामगारांचे नातेवाईक प्रचंड चिंताग्रस्त स्थितीत कारखान्याच्या प्रवेशद्वारावर जमा झाले होते.

थर्मिक फ्युइड  हिटरमध्ये ऑइल गरम करून ते ऑइल प्लांटमधील  टेक्स्टाइल मशीनवर फिरविले जात असताना, या थर्मिक फ्युइड  हिटरमधील  क्वाइलचा भीषण स्फोट होऊन त्यामधील उकळते ऑइल सर्वत्र बाहेर फेकले गेले आणि आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून, घटनेच्या निश्चित कारणांचा शोध सदर अधिकारी घेत आहेत. घटनास्थळी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, शिवसेनेचे पालघर विधानसभा क्षेत्रप्रमुख वैभव संखे, माजी सभापती मनीषा पिंपळे यांच्यासह  विविध शासकीय अधिकारी घटनास्थळी येऊन पाहणी करून, त्यांनी जखमी कामगारांची हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. 

टॅग्स :Accidentअपघातfireआग