चिंचोटी पुलावरील अपघातात दोन ठार

By Admin | Updated: March 28, 2017 05:08 IST2017-03-28T05:08:15+5:302017-03-28T05:08:15+5:30

मुंबई अहमदाबाद हाय् ावे वर गेल्या चार दिवसात पाच बळी गेले आहेत. रविवारी रात्री चिंचोटी

Two killed in accident on Chinchoti Bridge | चिंचोटी पुलावरील अपघातात दोन ठार

चिंचोटी पुलावरील अपघातात दोन ठार

वसई : मुंबई अहमदाबाद हाय् ावे वर गेल्या चार दिवसात पाच बळी गेले आहेत. रविवारी रात्री चिंचोटी पूलावरील एका बंद टेम्पोला मागून भरधाव आलेल्या ट्र्कने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला.
रविवारी रात्री ९.३०च्या सुमारास पेल्हार बरफपाडा येथे राहणाऱ्या दीपक सूर्यवंशी यांचा मालाने भरलेला टेम्पो चिंचोटी पूलावर बंद पडला होता. चालक बलराम यादव आणि बालाजी सूर्यवंशी बाहेर उभे राहून दुरुस्तीचे काम करीत होते. त्याचवेळी गुजरातच्या दिशेने भरधाव निघालेल्या एका ट्रकने टेम्पोला जोराची धडक दिली. त्यामुळे टेम्पो पूलाखाली दहा फूट खाली कोसळला. ट्रकच्या धडकेत दीपक, बालाजी आणि बलराम जखमी झाले. तर ट्रकचालक संतोष यादवही जखमी झाला.
जखमींना हायवेवरील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असताना दीपक सूर्यवंशी आणि संतोष यादव यांचा मृत्यू झाला. हायवेवरील अपघातात चार दिवसात पाच बळी गेले आहेत. शुक्रवारी वसई विरार महापालिकेच्या बसने ठोकर दिल्याने एकाचा मृत्यू झाला होता. तर शनिवारी दोन बाईकस्वार अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ठार झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Two killed in accident on Chinchoti Bridge