इंजिनिअरींगच्या दोन विद्यार्थ्यांचा देहर्जे नदीत मृत्यू

By Admin | Updated: March 30, 2016 01:14 IST2016-03-30T01:14:28+5:302016-03-30T01:14:28+5:30

आंघोळीसाठी गेलेल्या दोन युवकांचा देहर्जे नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना टेन गावाच्या हद्दीत घडली. ते आयडीयल इन्स्टिटयूट आॅफ टेक्नॉलॉजी कॉलेज, पासेरी मध्ये सिव्हील

Two engineering students die in river Deharge | इंजिनिअरींगच्या दोन विद्यार्थ्यांचा देहर्जे नदीत मृत्यू

इंजिनिअरींगच्या दोन विद्यार्थ्यांचा देहर्जे नदीत मृत्यू

मनोर : आंघोळीसाठी गेलेल्या दोन युवकांचा देहर्जे नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना टेन गावाच्या हद्दीत घडली. ते आयडीयल इन्स्टिटयूट आॅफ टेक्नॉलॉजी कॉलेज, पासेरी मध्ये सिव्हील इंजिनिअरचे शिक्षण घेत होते. मृतदेह शोधण्यासाठी मनोर पोलीस व इतरांना दोन तास लागले.
अनमोल मुकेश शाहू (२०), रा. मिरारोड व पंकज राधेशाम मिश्रा (२०) रा. वागळे इस्टेट ठाणे, ऋषिेकेश कृष्णा शेलार (२९) भिवंडी, नितेश शहाजी जावीर (२२) रा. माजीवाडा ठाणे हे ते बसमधून कॉलेजमध्ये जात होते. दि. २८ मार्च रोजी प्रॅक्टीकल व जेवण झाल्यानंतर हे चौघे दुपारी दिडच्या सुमारास टेन गावाच्या हद्दीतील देहर्जा नदीच्या बंधाऱ्याजवळ गेले. त्यापैकी अनमोल व पंकज यांनी नदीच्या पात्रात बंधाऱ्यावरून उडी मारली परंतु पाण्याच्या खोलीमुळे ते दोघेही पाण्यातून बाहेर न निघू न शकल्याने आतच अडकले मात्र ऋषिकेश व नितेश यांना पोहता येत नसल्याने त्यांना काही करता आले नाही. (वार्ताहर)

Web Title: Two engineering students die in river Deharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.