शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत इस्रायली दुतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या; ज्यूइश म्युझिअमबाहेर गोळीबार
2
किश्तवाडमध्ये ३-४ दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले; चकमक सुरु, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादांचा शोध सुरु...
3
१२ वर्षे तुरुंगात; वॉचमनला भरपाई देणार तरी कोण? चिमुरडीवर अत्याचार करणार खरा आरोपी आजही मोकाटच 
4
प्लेऑफ्सची लढाई जिंकली! पण Qualifier 1 च्या शर्यतीत MI स्वबळावर टिकणं मुश्किल, कारण...
5
एलओसीच नाही, नेपाळच्या सीमेवरून दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात; ३७ जण दबा धरून बसलेत...
6
उत्तर कोरियाची नवीकोरी युद्धनौका पाण्यात जाताना कोसळली; किम जोंग उन भडकले, सैन्यालाच कारवाईची धमकी दिली
7
"असं वाटलं मृत्यू समोर आलाय", इंडिगो विमानात अडकलेल्या तृणमूल कॉँग्रेसच्या नेत्या सागरिका घोष यांनी सांगितली आपबिती
8
वेतनवाढीच्या एक दिवस आधी निवृत्त झाले तरी पेन्शनमध्ये लाभ मिळणार : सरकार
9
अपरा एकादशी: पापांचा नाश अन् चुकांना क्षमा; पाहा, महत्त्व अन् मान्यता, ‘अशी’ करा व्रत पूजा
10
ज्योतीने इस्लाम धर्म स्वीकारला, दहशतवाद्यांसोबत संबंध, पाकिस्तानीसोबत लग्न केले?; पोलिसांनी सगळंच सांगितलं
11
कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन
12
VIDEO : तुफान गारपिटीत सापडले विमान, वैमानिकाने सुखरूप उतरवले; प्रवाशांत प्रचंड घबराट; करु लागले देवाचा धावा
13
शुक्रवारी अपरा एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, लाभच लाभ; भरभराट काळ, हाती पैसा राहील!
14
पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."
15
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
16
जगातील कुठलेही क्षेपणास्त्र राेखणार अमेरिकेचे ‘गोल्डन डोम’ कवच, US ला कुणाचा धोका? 
17
झेलेन्स्कींसारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचे दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी वाजले; रामाफोसा संबंध सुधारण्यासाठी आलेले...  
18
अयोध्येतील श्रीराम मंदिरात व्हिआयपींशिवाय ५ जून रोजी होणार राम दरबार प्राणप्रतिष्ठा सोहळा
19
केंद्राकडून राज्यपालांचा दुरुपयोग करत राज्य सरकारांच्या कामात अडथळे
20
न्यायालय ऑन ड्युटी; वकिलांना मात्र हवी सुट्टी! सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

वसईत दोन कंपन्यांना शनिवारी भीषण आग; सुदैवाने जीवित हानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 00:52 IST

fire in Vasai on Saturday : वसई पूर्वेकडील गावराई पाड्याच्या औद्योगिक वसाहतीमध्ये कोटिंग करणाऱ्या कंपनीत शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागली.

नालासोपारा : वसई पूर्वेकडील आणि नालासोपारा फाटा येथील दोन वेगवेगळ्या कंपन्यांत शनिवारी आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी एका कंपनीतील आग विझवली आहे, तर दुसऱ्या कंपनीतील आग विझवण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.वसई पूर्वेकडील गावराई पाड्याच्या औद्योगिक वसाहतीमध्ये कोटिंग करणाऱ्या कंपनीत शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागली. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र कंपनी पूर्ण जळून खाक झाली आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग पूर्णपणे विझवली आहे. या ठिकाणी गॅस सिलिंडर होते. पण प्रसंगावधान राखून अग्निशमन दलाच्या जवानांनी ७ सिलिंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.दुसऱ्या घटनेत नालासोपारा पूर्वेकडील पेल्हारफाटा येथील जाबर पाड्यातील कंसारा कम्पाउंडमधील थर्माकोल आणि प्लास्टिक प्रिंटिंग कंपनीला शनिवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान करीत आहेत.

सुरक्षिततेची नियमावली पायदळी नालासोपारा पेल्हार विभागात अनेक अनधिकृत कंपन्यांचे गाळे असून कोणत्याही सुरक्षिततेची नियमावली पायदळी तुडवून कंपन्या सुरू आहे. त्याकडे औद्योगिक सुरक्षा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. ही आग नेमकी कशाने लागली हे समजू शकले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान तीन वॉटर टँकरच्या सहाय्याने अथक परिश्रम करीत आहेत.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरार