गॅसचोरी करणाऱ्या दोघांना बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:09 IST2019-01-18T00:09:12+5:302019-01-18T00:09:13+5:30
मुद्देमाल ताब्यात : टॅँकरचालक अंधाराचा फायदा घेत पळाला

गॅसचोरी करणाऱ्या दोघांना बेड्या
मनोर : मुंबई अहमदाबाद महामार्गालगत चिलहार गावच्या हद्दीत हरबन्स पंजाब ढाब्यावर रात्री १०.३० च्या सुमारास पोलीस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकून गॅसचोरी करण्याºया दुकलीला टँकर, सिलेंडर व साहित्यासह अटक केले. त्यांच्यावर मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
रात्री पोलीस अधीक्षक पालघर यांच्या विशेष पथकाने गस्त घालीत असताना गॅसचा टँकर मधुन पाईप द्वारे सिलेंडर गॅसची चोरी करताना दोघांना रंगेहाथ पकहले. चनदीका यादव (३६) प्रवीण पपू नाईक (१८) यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले तर टँकर चालक फरार झाला आहे. तिघांवर मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर पुन्हा अवैध धंदे सुरू झाले असून ज्वालाग्राही पदार्थ व तेल माफिया पुन्हा डोकं वर काढत आहेत. पालघर अधीक्षकांच्या विशेष पथका मधील सहा फोजदार कदम, सुरवंशी, मयूर बगल व इतर पोलिसांनी ही कारवाई बजावली.