खराटतारा येथे दोन घरफोड्या, दुचाकी चोरीस
By Admin | Updated: June 30, 2017 02:34 IST2017-06-30T02:34:57+5:302017-06-30T02:34:57+5:30
मुंबई-अदमदाबाद महामार्गावर वसलेल्या खराटतारा या गावात काल रात्री जोरदार पावसाचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराच्या खिडक्या

खराटतारा येथे दोन घरफोड्या, दुचाकी चोरीस
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळ : मुंबई-अदमदाबाद महामार्गावर वसलेल्या खराटतारा या गावात काल रात्री जोरदार पावसाचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराच्या खिडक्या तोडून घरफोड्या केल्या यात संदीप वझे यांच्या घरातून ४० हजाराचे दागिने, सदानंद पाटील यांच्या मुलीच्या शालेय दप्तरातून २५० रुपयांवर डल्ला मारुन सतिश वझे यांची ८० हजाराची दुचाकीही लांबवली. या घटनेमुळे या गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
चोरांनी दोन्ही दोन्ही घरातील खिडक्यांचे ग्रील तोडून आत प्रवेश केला. घरातील इतर दरावाज्यांच्या कडी लावून कपाटातून ४० हजाराचे दागिने चोरले तर सदानंद यांच्या घरातून काहीच हाती आल्याने मुलीच्या दप्तरातील २५० रुपये पळवले.
या घटनेची नोंद मांडवी पोलीस चौकीत झाली असून मागील वर्षी या भागात अनेक चोऱ्या झाल्या ही या पावसाळ्यातील पहिली चोरी असल्याने तत्काळ चोरांच्या
मुसक्या न आवळल्यास चोरीच्या आणखी घटना घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.