शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

२१ लाखांचे एम डी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या बिश्नोई, गॅंगच्या पाच आरोपींना पकडण्यात तुळींज पोलिसांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 16:51 IST

Nalasopara Crime News: शहरातील पूर्वेकडील एका इमारतीच्या घरातून  सोमवारी संध्याकाळी २१ लाख रुपयांचे एम डी नावाचा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या बिश्नोई गॅंगच्या पाच आरोपींना अटक करण्यात तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

- मंगेश कराळे नालासोपारा - शहरातील पूर्वेकडील एका इमारतीच्या घरातून  सोमवारी संध्याकाळी २१ लाख रुपयांचे एम डी नावाचा अंमली पदार्थ बाळगणाऱ्या बिश्नोई गॅंगच्या पाच आरोपींना अटक करण्यात तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पुन्हा नालासोपारा शहरात मिळाल्याने खळबळ माजली असून ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. तुळींज पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर एका फरार मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

तुळींजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शलेंद्र नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिथुन म्हात्रे यांना दत्त नगर येथील एका इमारतीच्या घरात अंमली पदार्थ खरेदीसाठी ४ ते ५ जण राजस्थान येथून येणार असल्याची माहिती मिळाली होती. माहितीनुसार, दत्त नगर येथील दत्त आशीर्वाद इमारतीमधील सदनिका नंबर ३०२ मध्ये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी सापळा लावून धाड टाकली. त्यावेळी राजस्थान राज्यातून एम डी विकत घेण्यासाठी आलेले दिनेशकुमार बिश्नोई (३१), सुनिल बिश्नोई (३०), ओमप्रकाश किलेरी (३०), लादूराम बिश्नोई (४०) आणि प्रकाशकुमार बिश्नोई (२३) या पाच बिश्नोई टोळीतील आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपींची झडती घेतल्यावर त्यांच्या कब्जात २१० ग्रॅम वजनाचा २१ लाख रुपये किंमतीचा एम डी नावाचा अंमली पदार्थ मिळून आला. तसेच सात मोबाईल, इलेक्ट्रिक वजन काटा, प्लास्टिक पिशव्या, रोख असा एकूण २२ लाख ८ हजार ५१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना घरी बोलावून अंमली पदार्थ विकणारा प्रकाश भादू याच्यावरही गुन्हा दाखल केला असून या फरार आरोपीचा शोध तुळींज पोलीस घेत आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर चव्हाण, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब बांदल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार आनंद मोरे, उमेश वरठा, आशपाक जमादार, माने, केंद्रे, कदम, छबरीबन यांनी केली आहे.

१) पाचही आरोपींना मंगळवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.- विनायक नरळे (सहाय्यक पोलीस आयुक्त)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार