जिप्समसंदर्भात तहसीलदारांकडे मंगळवारी बैठक
By Admin | Updated: February 3, 2017 02:15 IST2017-02-03T02:15:28+5:302017-02-03T02:15:28+5:30
तालुक्यातील नारे व वडवली या ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या जिप्सम या कंपनीच्या प्रदूषणा पासून जनतेला होत असलेल्या त्रासाच्या संदर्भात तहसिलदार दिनेश कु-हाडे

जिप्समसंदर्भात तहसीलदारांकडे मंगळवारी बैठक
वाडा : तालुक्यातील नारे व वडवली या ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या जिप्सम या कंपनीच्या प्रदूषणा पासून जनतेला होत असलेल्या त्रासाच्या संदर्भात तहसिलदार दिनेश कु-हाडे यांनी ७ फेब्रुवारीला बैठक बोलवली आहे. यांनी येत्या ७ तारखेला तहसीलदार कार्यालयात बैठक बोलावली आहे.
तालुक्यातील नारे गावातील जिप्सम कंपनीमुळे होणा-या प्रदूषणाने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यांनी ग्रामसभेतील चर्चा आणि ठरावाच्या आधारे एमपीसीबीकडे तक्र ार केली होती. त्या अनुषंगाने उपप्रादेशिक अधिका-यांनी ३० डिसेंबरला केलेल्या चौकशीत कंपनी दोषी आढळली आहे. जिप्सम कंपनीकडून परिसरात सांडपाणी सोडले जाते. गावाच्या हद्दीत उघड्यावर कचरा टाकला जातो. उघड्यावर क्र शिंग करून भुकटी तयार केली जाते. कंपनीच्या आवारात भुकटीचा साठा उघड्यावर ठेवला जातो. फ्लाय अॅश चा साठाही उघड्यावर ठेवला जातो असे आढळले. याबाबत कंपनीने कमालीची हलगर्जी दाखवून तरतूदींचा भंग केला आहे. याबाबत कंपनीला प्रदूषण विभागाने दोन नोटीसाही काढल्या आहेत. आता तहसीलदारांनी सर्वच खात्यांच्या प्रमुखांबरोबर येत्या ७ तारखेला ३ वाजता कार्यालयात बैठक बोलावली आहे.
वाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, ग्रामसेवक नारे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी जिप्सम चे अधिकारी, नारे ग्रामपंचायतीचे सरपंच यांना बैठकीला बोलावले आहे. या बैठकीत काय चर्चा होते व कंपनीवर काय कारवाई होते याकडे नारे, वडवली व मुसारणे येथील तमाम नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने काय कारवाई केली हे मात्र अज्ञातच राहिले आहे.(वार्ताहर)