शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी महिलांची जंगलात भटकंती

By admin | Updated: January 11, 2016 01:45 IST

शासनाने आदिवासी विकासाचा कितीही डंका वाजवला असला तरी अजूनही आदिवासींच्या नशिबी वनवासाचा शाप मिटलेला नाही. टिचभर पोटाची खगळी भरण्यासाठी उन्हा

शौकत शेख, डहाणू शासनाने आदिवासी विकासाचा कितीही डंका वाजवला असला तरी अजूनही आदिवासींच्या नशिबी वनवासाचा शाप मिटलेला नाही. टिचभर पोटाची खगळी भरण्यासाठी उन्हा-तान्हात काट्या-कुट्यांची वाट तुडवत डोंगरावर चढून लाकडाच्या फाट्या गोळा करायच्या आणि त्याचा पंचवीस ते तीस किलोचा भारा डोक्यावर घेत बारा ते पंधरा किलोमिटर चालून, शहरभर फिरून त्याची विक्री करायची. त्यातून हाताला जे काही पाच-पन्नास रुपये मिळतील त्यात स्वत:बरोबर मुलाबाळांचेही पोट भरायचे आणि त्यातून संसाराचा गाडा कसाबसा पुढे रेटायची वेळ आदिवासी महिलांवर आली आहे. त्यामुळे आदिवासी विकासासाठी विविध योजना आखणाऱ्या सरकारने त्या त्यांच्यापर्यंत पोहचवण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अठराविश्वे दारिद्र्य, हातावर चालणारे पोट त्यातही घरात खाणारी तोंडे अनेक. ना रहायचा ठिकाणा , ना कामाचा. रोजगार नसल्याने निसर्गदत्त जंगलाचाच काय तो आधार. पालघर जिल्ह्यातील रेती उत्खनन बंदी, डहाणू तालुक्यातील उद्यांगबंदीमुळे डहाणूच्या डोंगर-कपारीत राहणाऱ्या आदिवासींवर उपासमारीची वेळ आली आहे. डहाणूच्या मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या पलीकडे असलेल्या गडचिंचले, दाभाडी, किन्हवली, गांर्गुडी, सुकटआंबा, वळणी, आंबोली, दाभाडी, दाभोण, सोनाले, महालक्ष्मी, मोडगाव, रायपूर, आपटा, कळमदेवी,शिलोंडा, बापूगाव, सायवन, ओसारविरा, दिवसी इत्यादी दुर्गम भागातील आदिवासी समाजाकडे रोजगाराचे दुसरे कुठलेही साधन नसल्यामुळे येथील आदिवासी महिला दररोज पहाटे घनदाट जंगलात पायपीट करीत जीव धोक्यात टाकत सुक्या लाकडाचे फाटे गोळा करून तालुक्याच्या विविध भागात जाऊन विक्री करीत असतात. तर त्यापैकी काही मोळी (लाकडे) आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी घरी ठेवतात. गेल्या दोन वर्षापासून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे.