आदिवासी मदतीपासून वंचितच
By Admin | Updated: January 12, 2017 05:47 IST2017-01-12T05:47:49+5:302017-01-12T05:47:49+5:30
या तालुक्यातील निंबापूर येथील गंगाराम जयराम गांगडे यांच्या घराला २९ एप्रिल २०१६ रोजी आंब्याची फांदी विजेच्या खांबावर

आदिवासी मदतीपासून वंचितच
डहाणू : या तालुक्यातील निंबापूर येथील गंगाराम जयराम गांगडे यांच्या घराला २९ एप्रिल २०१६ रोजी आंब्याची फांदी विजेच्या खांबावर पडल्याने स्पार्किंग होऊन आग लागली होती व संपूर्ण घर खाक झाले होते.
ग्रामस्थांनी मदत देऊन त्यांच्यासाठी तात्पुरता निवारा उभा केला होता.मात्र या घटनेला बुधवारी ९ महिने उलटूनही सरकारी मदत मिळाली नसल्याने कुटुंब बेघर होण्याची वेळ ओढवली आहे. २९ एप्रिल ला लागलेलया आगीत घराची लाकडे ,भाताचे कणगे १५०कि.तांदूळ ,कपडे ,भांडी ,चांदीचे पैंजण ,भात झोडण्याची मशिन,रोख रक्कम आदी खाक झाल्याने एकंदर २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा गांगडे यांनी केला आहे. महावितरण कंपनी, महसूल अधिकारी यांच्याकडे मदतीसाठी फेऱ्या मारून चपला झिजून गेल्या आहेत. मात्र मदत काही मिळाली नसल्याची खंत गंगाराम गांगडे यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली . (वार्ताहर)