आदिवासीचा खून : चौघांना जन्मठेप,दोघे निर्दोष

By Admin | Updated: August 25, 2015 23:09 IST2015-08-25T23:09:18+5:302015-08-25T23:09:18+5:30

येथील देवखोप (तांडेलपाडा) येथे आदिवासी पाड्यामध्ये खावटी धान्याचे वाटप करण्यापोटी मागण्यात आलेले शंभर रुपये परत मागीतल्याचा राग मनात धरून माजी सरपंच बाबुराव

Tribal murders: Four times life imprisonment, both innocents | आदिवासीचा खून : चौघांना जन्मठेप,दोघे निर्दोष

आदिवासीचा खून : चौघांना जन्मठेप,दोघे निर्दोष

पालघर : येथील देवखोप (तांडेलपाडा) येथे आदिवासी पाड्यामध्ये खावटी धान्याचे वाटप करण्यापोटी मागण्यात आलेले शंभर रुपये परत मागीतल्याचा राग मनात धरून माजी सरपंच बाबुराव चिपाटसह अन्य ७ ते ८ लोकांनी केलेल्या मारहाणीत बाबू बसवत यांचा मृत्यू झाला होता. नुकताच या प्रकरणाचा निकाल लागून पालघर न्यायालयाचे अतिरीक्त सत्र न्यायाधिश एम. एस. शिरसागर यांनी चार आरोपींना अजन्म कारावासाची शिक्षा सुनावणी असून दोघांची निर्दोष मुक्तता केली आहे.
याप्रकरणी दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे करण्यात आल्यानंतर सरकारी वकील परवेझ पटेल यांनी उपलब्ध असलेले भक्कम पुरावे न्यायालयापुढे सादर केल्यानंतर न्यायालयाने किशोर चिपाट, राजु लोखंडे, संजय सोमण, केशव बरड या चार आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. तर अरविंद बसवत व अजय लडे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील पटेल यांनी दिली. आरोपी असणारे तत्कालीन सरपंच असणारे बाबुराव चिपाट यांचा मृत्यू झाला आहे. पावसाळ्यात आदिवासींना शासनाकडून खावटी धान्य वाटप करण्यात येते.
दि. २५ जून २०१० रोजी देवखोप येथील सातिवली या आदिवासी पाड्यात धान्य वाटपा दरम्यान माजी सरपंच बाबूराव चिपाट, अरविंद मानक्या बसवत, अजय द. लडे यांनी प्रत्येकी शंभर रुपयांची मागणी केल्याने काही लोकांनी पैसे दिले होते. परंतु गडग पाड्यातील लोकांनी शंभर रूपये न दिल्याने आमचेही पैसे परत करा अशी मागणी बाळू बसवत व विनोद बसवत यांनी केल्याने त्यांना धमक्या देऊन त्याच संध्याकाळी त्यांचावर हल्ला करण्यात आला होता. या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष होते.

Web Title: Tribal murders: Four times life imprisonment, both innocents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.