शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

भातखरेदीत आंबिस्ते येथे आदिवासींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 23:11 IST

व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल; क्विंटलच्या पोत्यात भरले सव्वाशे किलो

- शशिकांत ठाकूरकासा : डहाणू तालुक्यातील उर्से ग्रामपंचायत हद्दीतील आंबीस्ते गावात भातखरेदी करण्यासाठी आलेल्या व्यापाºयांनी आदिवासी शेतकºयांची फसवणूक केल्याची घटना येथे घडली. याबाबत ग्रामस्थांनी वाणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून ट्रकही जप्त केला आहे. या व्यापाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भातखरेदी करण्यासाठी अनेक व्यापारी डहाणूच्या आदिवासी भागात येतात. मंगळवारी अंबिस्ते गावात एक व्यापारी भात खरेदीसाठी आला होता. आदिवासी शेतकºयांचे भात खरेदी करून त्याची भराई व तोलाई केली जात असतांना या व्यापाºयाच्या चलाखीचा शेतकºयांना संशय आला. निरीक्षणाअंती जागरूक नागरिक सतेंद्र मातेरा यांनी फसवणूक कशी होते आहे. ती सर्वांसमोर उघड केली. या व्यापाºयांनी आदिवासी शेतकरी रमाकांत पारधी, विलास चित्या पारधी, अनिल विकास पारधी, राजू देवू धापसी, सखाराम देवू धापसी यांची फसवणूक केली होती.दरम्यान हा व्यापारी शेतकºयांकडून भात खरेदी करतांना एका क्विंटलच्या गोणीत १०० किलो भात भरण्याऐवजी मोठी गोणी वापरून ती मध्ये १२५ किलो भात भरत असे. आणि शेतकºयांच्या अज्ञानाचा फायदा घेवून हिशोब देताना केवळ ८० किलो प्रमाणे रक्कम देत असे. अशा प्रकारे त्याने येथील आदिवासी शेतकºयांची भातखरेदीत ५३ क्विंटलची फसवणूक केल्याचे उघड झाले.पोलीस पाटील नागरिक यांची जागरूकतायेथील पोलीस पाटील यशवंत म्हसकर, जागरूक नागरिक मधुकर पाटील, रमेश म्हसकर, अन्य ग्रामस्थ यांनी व्यापाºयाच्या फसवणूक प्रकरणी वाणगाव पोलिसात तक्रार दाखल केली.व्यापारी सदानंद म्हसे याला ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक गरड पुढील कारवाई करत आहेत. त्याने अन्य काही गावात अशाच रितीने कुणाची फसवणूक केली आहे काय? याचाही तपास सुरु आहे.आदिवासी शेतकर्यांची व्यापाºयाकडून फसवणूक झाल्याने त्याविरु द्ध पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली आहे. त्याच्यावर कारवाई व्हावी. - यशवंत म्हसकर, पोलीस पाटीलयापूर्वीही ७ ते ८ वेळा हे व्यापारी भातखरेदी करण्यासाठी आले होते. त्यावेळी गरीब व निरक्षर आदिवासी शेतकºयांची त्यांनी फसवणूक केली होती. - रमेश म्हसकर, ग्रामस्थ

टॅग्स :fraudधोकेबाजीpalgharपालघर