जव्हारमध्ये आदिवासी मुलांना मिळाला कृषी संबंधित रोजगार
By Admin | Updated: April 16, 2017 04:19 IST2017-04-16T04:19:35+5:302017-04-16T04:19:35+5:30
प्रगति प्रतिष्ठान व सिजेंन्टा फाऊंडेशन आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ४५ दिवसांचा निवासी कृषी विषयक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या नऊ प्रशिक्षणार्थ्यांना

जव्हारमध्ये आदिवासी मुलांना मिळाला कृषी संबंधित रोजगार
जव्हार : प्रगति प्रतिष्ठान व सिजेंन्टा फाऊंडेशन आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ४५ दिवसांचा निवासी कृषी विषयक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या नऊ प्रशिक्षणार्थ्यांना खाजगी विभागामध्ये नोकरी मिळाली आहे. संस्थेकडून हे प्रशिक्षण मोफत दिले जाते. या वर्गासाठी ६९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. पैकी वीस जणांना प्रवेश मिळाला होता.
प्रशिक्षण यशस्वि पूर्ण करणाऱ्या मधुकर मालक, वसंत गांगडा, अनंता मालक आणि योगेश लचके या चार विद्याथ्यार्ची कृषीदुत बायो हर्बल्स या नामकिंत कंपनीत कृषी सेवक म्हणून नोकरी मिळाली. तर अजय सुतार हा विद्यार्थ्यी केशरी केमिकल्स प्रा. लि. या कृषी कंपनीत रुजू झाला आहे. तसेच दिपक वांगड व अनिल वारघडे यांनी कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून कृषी उद्योजक होण्याचे स्वप्न सार्थ ठरविले. तसेच प्रकाश बरफ व मनोहर डोके या विद्याथ्यार्नी आपलीच शेती सुधारित व तंत्रज्ञानाचा वापर करुन चांगल्या पध्दतीने शेती करण्यांचे ठरविले आहे. संस्थेने दुसरे प्रशिक्षण वर्ग एप्रिल २०१७ च्या दुसऱ्या आठवडयात सुरु करण्यांचे निश्चित केले असून त्याकरीता इच्छुक कृषी किमान १० वी पास उमेदवारांकडून अर्ज ए.टी.ए. अॅग्रीकल्चर टेक्नॉलाजी असिस्टंट ट्रेनिंग सेंटर, व्दारा प्रगति प्रतिष्ठान, जव्हार जि. पालघर येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (वार्ताहर)