भूकंपाचे भय अजूनही उरावर, वैज्ञानिकांनी केली घटनास्थळाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 06:20 AM2018-01-06T06:20:21+5:302018-01-06T06:20:33+5:30

तहसीलदार कार्यालय मार्फत तहसीलदार यांनी फक्त पाहणी करून अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे . मात्र अद्यापही भूगर्भ विभागामार्फत कुठलीही तातडीची उपाय योजना करण्यात आली नसल्याने नागरिक चिंतीत आहेत.

 The tremors of the earthquake are still high, the scientists carried out the site inspection | भूकंपाचे भय अजूनही उरावर, वैज्ञानिकांनी केली घटनास्थळाची पाहणी

भूकंपाचे भय अजूनही उरावर, वैज्ञानिकांनी केली घटनास्थळाची पाहणी

Next

- हुसेन मेमन
जव्हार  -  तहसीलदार कार्यालय मार्फत तहसीलदार यांनी फक्त पाहणी करून अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे . मात्र अद्यापही भूगर्भ विभागामार्फत कुठलीही तातडीची उपाय योजना करण्यात आली नसल्याने नागरिक चिंतीत आहेत. भूगर्भ विभागामार्फत आलेल्या अहवालावरून योग्य उपाय योजना करण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु जव्हार भागात वारंवार बसणाºया भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक घरांना तडे गेल्याचे पहावयास मिळत असून गावपाड्यातील अनेक घरातील लोकांनी भीती पोटी घर सोडून माळ रानात व शेतात स्थलांतर केले आहे.
जव्हार तालुक्यातील वाळवंडा, चौक, पाथर्डी, कशिवली या भागातील घरांचे बसलेल्या हादर्यांनी छोटेमोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनामे करण्यात असून येथील ग्रामस्थांनी तंबू ठोकण्यासाठी ताडपत्री मागवून तंबू ठोकून व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. तसेच या आठवड्यातच सरक्षित तंबू उभरु न देण्यात येतील असे जव्हारचे नायब निवासी तहसीदार सुयोग बेंद्रे यांनी सांगितले.
जव्हार वाळवंडा चौक, येथील नागरिकांनी घाबरून जावू नये, तसेच भूकंपाची तीव्रता लक्षात घेता ती आता पर्यंत ३.१ ते ३.२ रिश्टर स्केल पर्यंत मोजण्यात आली असून त्या मानाने कमी असल्याचे सांगून लोकांनी कोणत्याही प्रकारची भिती बाळगू नये असे आवाहन प्रशासनाचे अधिकारी भूकंपतज्ञ (कुलाबा ) किरण नारखेडे यांनी केले आहे.
वाळवंडा गावात याहूनही विदारक चित्र पाहायला मिळत असून भूकंपाच्या भीती पोटी गावातील ग्रामस्थ अक्षरश: शेतात किंवा माळ रानात राहत आहेत. एकीकडे नैसिर्गक आपत्तीची भीती तर दुसरीकडे जंगली प्राण्यासह, साप, विंचूमुळे जीव जाण्याचा भीतीने रात्र काढत आहेत. काहीतरी व्यवस्था होईल या आशेवर ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन वावरत आहे. माळ रानात, शेतात झोपडीत जंगली प्राणी व विषारी प्राण्यांमूळ जीव गेल्यास याला कोण जबाबदार राहील असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तज्ज्ञाकडून भूकंपग्रस्त भागात पाहणी दोन महिने चालणार परीक्षण

जव्हार तालुक्यातील शुक्रवारी या भूकंपग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दिल्ली येथून भूकंपमापक यंत्र घेऊन वैज्ञानिकांची टीम दाखल झाली होती. या भूकंप वैज्ञानिकांच्या टीमने शुक्र वारी या परिसराची पाहणी करण्यात आली.

तसेच वाळवंडा, चौक या ठिकाणी भूकंपमापक यंत्र बसविण्यात आले आहेत. तसेच या भागात दोन महिने राहून भूकंपाची तीव्रता किती आहे. तेही तपासले जाणार आहे.

तसेच, या यंत्राचा आढावा घेवून, दोन महिने भूकंपाची तीव्रता किती आहे. हे सांगितले जाईल असे दिल्ली येथील सिसमोलॉजी वैज्ञानिक मंजितिसंग यांनी सांगितले.

Web Title:  The tremors of the earthquake are still high, the scientists carried out the site inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.