झाडे तोडली जातात, मात्र लावली जात नाहीत
By Admin | Updated: September 7, 2015 03:48 IST2015-09-07T03:48:16+5:302015-09-07T03:48:16+5:30
पालघर व ठाणे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीतील जंगलातील झाडे वन खात्याच्या परवानगीने तोडली जातात. प्रति झाड ५ रू. प्रमाणे पैसे जमा केले जातात पण पुन्हा नवीन झाडे लावली जात नाही.

झाडे तोडली जातात, मात्र लावली जात नाहीत
आरिफ पटेल , मनोर
पालघर व ठाणे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीतील जंगलातील झाडे वन खात्याच्या परवानगीने तोडली जातात. प्रति झाड ५ रू. प्रमाणे पैसे जमा केले जातात पण पुन्हा नवीन झाडे लावली जात नाही.
शेतकऱ्यांनी आपल्या मालकीच्या जमिनीत असलेली झाडे तोडण्याच्या कागदपत्रासहीत वन विभागाकडे प्रकरण गेले की वन विभागामार्फत जमिनीत असलेल्या झाडांचे पंचनामे केले जातात. झाडांची संख्या किती आहे ते मोजले जाते. सर्व कागदपत्रे तपासणी केली जातात नंतर वनपाल व इतर कर्मचाऱ्यांमार्फत पुन्हा तोडलेल्या झाडांचे पंचनामे केले जातात त्यानंतर जेवढी झाडे तोडली आहेत तेवढी नव्याने लावण्याचा नियम १९८० सालापासून लागू आहे परंतु कुठेही झाडे लावण्यात येत नाही.
१९८० पासून तीन वेळा तोड
शेतकऱ्यांकडून वनविभाग हमीपत्रक लिहून घेते. त्यानुसार, एक झाडाचे किंमत ५ रू. घेतली जाते. परंतु वन विभागाच्या नर्सरीमधून त्यांना झाडे (रोपे) दिली जात नाही. १९८० पासून आतापर्यंत तीन तीन वेळा मालकी झाडे तोडण्यात आली. मात्र कुठेही नवीन लागवड झालीच नाही. जमिनीत असलेल्या जुन्या झाडांचे बुड पुन्हा रुजून त्याचीच झाडे तयार झाली. दोन्ही जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांच्या मालकीची (झाडे) तोडले जातात त्याची प्रती झाड ५ रू. रक्कम वनविभागात जमा झाली आहे. त्या रकमेचे काय झाले? हा प्रश्न आहे.