येथे केवळ महिलांना प्रवासभाडे, बोटीने जाण्यासाठी पुरूषांना फुकट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 12:07 AM2019-07-29T00:07:57+5:302019-07-29T00:08:18+5:30

अर्नाळा गावातील अजब प्रथा : बोटीने जाण्यासाठी पुरूषांना भाडे नाही

Travel only for women here in virar | येथे केवळ महिलांना प्रवासभाडे, बोटीने जाण्यासाठी पुरूषांना फुकट

येथे केवळ महिलांना प्रवासभाडे, बोटीने जाण्यासाठी पुरूषांना फुकट

Next

प्रतीक ठाकूर

विरार : अर्नाळा सागरी किनाऱ्यापासून पासून काहीच अंतरावर अर्नाळा किल्ला आहे. मात्र, या किल्ल्यात जाण्यासाठी केवळ महिलांकडून प्रवास भाडे घेतले जाते तर पुरूष फुकट प्रवास करतात. आतापर्यंत गावकऱ्यांनी किंवा प्रशासनाने यावर काहीच आक्षेप घेतलेला नाही.

अर्नाळा सागरी परिसरात असलेल्या अर्नाळा किल्ला गावात रोज हजारो लोक ये - जा करत असतात. अर्नाळा किल्ला गावात तीन साडे तीन हजारच्या जवळपास लोकसंख्या आहे. हे गाव समुद्रातील एक बेट असून येथे प्रवासाठी केवळ फेरी बोट हे एकमेव साधन आहे. मात्र, येथील एका पद्धतीमुळे महिलांना प्रवास करणे कठीण होते आहे.

या गावात प्रवासासाठी असलेल्या फेरी बोटीत केवळ महिलांकडून प्रवास भाडे घेतले जाते. तर गावातील पुरु ष मंडळी फुकट प्रवास करतात. असे का? याचे उत्तर मात्र कुणाकडे नाही आहे. परंपरागत ही प्रथा सुरू आहे. आणि काळ बदलला तरी ही प्रथा तशीच सुरू आहे. विशेष म्हणजे, याचे कुणाला काहीच गैर वाटत नाही. प्रवासासाठी दुसरे कोणतेही साधन या गावात नाही. सध्या येथे ठेका पद्धतीने दोनच प्रवासी वाहतूक बोट आहेत. ही बोट कंत्राटी पद्धतीने मेरीटाइम बोर्डाच्या नियमानुसार चालवली जाते. त्याचे प्रवासी भाडे हे सुद्धा मेरीटाइम बोर्डने ठरविले आहे. पण यात गावाच्या या अजब प्रथेनुसार केवळ गावातील महिलांना प्रवासासाठी पैसे मोजावे लागतात.
पुरु ष मासेमारी करतात आणि आणीबाणीच्या प्रसंगाच्या वेळी धावून येतात. तर महिला मासेमारी करून आणलेले मासे विक्र ीसाठी नेतात. त्यामुळे घराचे संपूर्ण अर्थकारण त्यांच्याकडे असते, म्हणून महिलांकडून पैसे घेतले जातात अशी माहिती गावकºयांनी दिली. विशेष म्हणजे, या गावातील महिला सुद्धा या प्रथेच्या विरोधात जात नाहीत. केवळ परंपरागत रीत असल्याने त्या निमूटपणे त्याचे पालन करतात. सध्या गावातील परिस्थिती बदलली आहे. महिलांना सतत कोणत्या न कोणत्या कामासाठी शहरात जावे लागते. मुलांना शाळेत सोडणे असेल, भाजीपाला, शिक्षण, नोकरी याकामी महिलांना प्रवास करावा लागत आहे. प्रयेक वेळेस त्यांना या प्रवासासाठी १० रु. मोजावे लागतात. स्त्री पुरु ष समानतेचे धडे गल्लो गल्लीतून दिले जात आहेत. पण केवळ परंपरेच्या नावाखाली महिलांना असमानतेची वागणूक दिली जात असल्याचे उदारण आहे.

आमच्या गावातील सर्व आर्थिक व्यवहार हा महिलांच्या हाती आहेत, ही प्रथा अनेक वर्षापासून सुरु आहे. महिलांकडे पैसे असतात म्हणून फक्त महिला प्रवासभाडे देतात. परंपरागत प्रथा असल्याने नाईलाजास्तवर आम्हाला तोटा सहन करून व्यवसाय करावा लागत आहे. ङ्क्त
- चंद्रकांत मेहेर,
ठेकेदार, मेरी टाईम बोर्ड

ही गावाची प्रथा आहे, आणि ती कधीपासून सुरु झाली याची कुणालाही माहिती नाही. पण परंपरा म्हणून आम्ही सर्वजण याचे पालन करतो.
- आनंद मेहेर, स्थानिक

आमच्या घरातील पुरूष खोल समुद्रात जाऊन मासेमारी करतात, वेळ प्रसंगी मदतीला धावतात. त्यांनी पकडून आणलेले मासे आम्ही विकून पैसा मिळवतो, त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार महिलांकडे असतात. या प्रथेचे आम्हाला काहीही वाटत नाही
- वनिता वैती, स्थानिक
 

Web Title: Travel only for women here in virar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.