वसईसह दोन शहरांतील वाहतूककोंडी फुटणार
By Admin | Updated: November 16, 2015 23:50 IST2015-11-16T23:50:39+5:302015-11-16T23:50:39+5:30
वसई-विरार शहरांतील वाहतूककोंडीची समस्या लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. मनपा हद्दीतील चार शहरांत सिग्नल यंत्रणा बसवण्याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली.

वसईसह दोन शहरांतील वाहतूककोंडी फुटणार
वसई : वसई-विरार शहरांतील वाहतूककोंडीची समस्या लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. मनपा हद्दीतील चार शहरांत सिग्नल यंत्रणा बसवण्याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली. सध्या ४ शहरांतील वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यापूर्वी चार नगरपरिषदा अस्तित्वात असताना नवघर-माणिकपूरने सिग्नल यंत्रणा बसविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, शासकीय अनुदान न मिळाल्यामुळे या सिग्नलचे दिवे कधी पेटलेच नाहीत.
काही वर्षांत ४ शहरांमध्ये चारचाकी, दुचाकी वाहने व रिक्षांमध्ये भरमसाट वाढ झाली. तीन वर्षांपूर्वी परिवहन सेवा सुरू झाली, त्यामुळे सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी जाणवू लागली. वाहतूक पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण राखण्याकामी त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहनांच्या संख्येतील भरमसाट वाढ लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने आपल्या हद्दीत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. या प्रस्तावास नुकतीच मंजुरी मिळाल्यामुळे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १५ वर्षांपूर्वी तत्कालीन नवघर-माणिकपूर नगरपरिषदेने आपल्या हद्दीत सिग्नल व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. (प्रतिनिधी)