१५७ प्रभागांसाठी एकूण १०६९ अर्ज

By Admin | Updated: April 4, 2016 01:52 IST2016-04-04T01:52:35+5:302016-04-04T01:52:35+5:30

या तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या १५७ प्रभागांसाठी आज आहेत. शेवटच्या दिवसापर्यंत १०६९ अर्ज दाखल झाले आहेत. जव्हार पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात त्यासाठी प्रचंड झुंबड उडाली होती

Total 106 9 applications for 157 wards | १५७ प्रभागांसाठी एकूण १०६९ अर्ज

१५७ प्रभागांसाठी एकूण १०६९ अर्ज

जव्हार : या तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या १५७ प्रभागांसाठी आज आहेत. शेवटच्या दिवसापर्यंत १०६९ अर्ज दाखल झाले आहेत. जव्हार पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात त्यासाठी प्रचंड झुंबड उडाली होती यावेळी भर उन्हात उमेदवार, त्यांचे सूचक, अनुमोदक व समर्थकांनी लांबच लाब रांगा लावल्या होत्या. निवडणूक आयोगाने जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र नामनिर्देशन पत्रा सोबतच जोडण्याची अट ऐन वेळी शिथिल केल्यामुळे शेवटच्या दिवशीच उमेदवारी अर्ज दाखल करतांना अनेकांची दमछाक होत होती. हातात अर्ज घेऊन रांगेत उभे असलेले आपला नंबर येईपर्यंत आवश्यकत ते दस्तऐवज गोळा करण्यासाठी समर्थकांकरवी धावपळ करीत होते. यामुळे कधी नव्हे इतकी मोठी उमेदवारांची रांग पहायला मिळाली. जात पडताळणी वैध्यता प्रमाणपत्र आता निवडणुकी नंतर सहा महिन्यात सादर करण्याची मुदत आयोगाने दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर जरी लढविल्या जात नसल्यातरी प्रत्येक पक्षाने दुसऱ्या चिन्हावर आपल्या पक्षाचे उमेदवार अथवा पॅनल तयार केल्याने पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात आपल्या उमेदवारांनी अर्ज योग्य रितीने भरले आहेत कि नाही याची शहानिशा जातीने करत होते. जव्हार तालुक्यात ४८ ग्रामपंचायती आहेत त्यापैकी वालवंडा ग्रामपंचायतीची निवडणूक काही महिन्यांपूर्वीच झाल्याने तेथील निवडणुका होणार नाहीत तर जामसर व बरवाडपाडा ही ग्रामदान मंडळे असल्याने तेथे ग्रामपंचायती सारखी निवडणूक न होता अध्यक्ष निवडला जात असल्याने तेथे निवडणुका होणार नसल्यामुळे ४७ ग्रा.पं. च्या निवडणुकीचा कार्यक्र म जाहीर झाला.
तालुक्यात १५७ प्रभागातून ऐकूण ४३७ सदस्य निवडले जाणार आहेत. जव्हार हा आदिवासी तालुका असल्यामुळे इतर मागासवर्गीय महिला व अनुसूचित जातीसाठी प्रत्येकी केवळ एकच जागा राखीव आहे तर उर्विरत ४३२ जागां अनुसूचित जमाती साठी राखीव आहेत.
गेल्यावर्षीच झालेल्या लोकसभा, विधानसभा,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भा.ज.पा. ने तालुक्यावरील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.पालघर जि.प. अध्यक्षा सुरेखा थेतले जव्हार तालुक्यातील आहेत.

Web Title: Total 106 9 applications for 157 wards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.