उद्या बोईसर बंदची हाक

By Admin | Updated: August 18, 2015 23:18 IST2015-08-18T23:18:11+5:302015-08-18T23:18:11+5:30

येथील उड्डाणपुलाजवळील प्लॉट विक्रीची एमआयडीसीची प्रक्रिया रद्द करून ती जागा मैदानाकरीता राखीव ठेवण्यात यावी या मागणी करीता गुरूवारी

Tomorrow's call by Boiser | उद्या बोईसर बंदची हाक

उद्या बोईसर बंदची हाक

बोईसर : येथील उड्डाणपुलाजवळील प्लॉट विक्रीची एमआयडीसीची प्रक्रिया रद्द करून ती जागा मैदानाकरीता राखीव ठेवण्यात यावी या मागणी करीता गुरूवारी (दि. २०) बोईसरकर रस्त्यावर उतरणार असून या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष व सामाजिक संघटनांनी बोईसर बंदची हाक दिली आहे.
१४ मे २०१० साली याच मैदानाकरीता बोईसर बंद करुन एमआयडीसीच्या दुटप्पी धोरणा विरोधात आंदोलन करण्यात आले होते. सध्या वादग्रस्त ठरु पहाणारा प्लॉट मैदानाकरीता राखीव ठेवण्यात येईल असे आश्वासन एमआयडीसी च्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांना मुंबईतील अंधेरी येथील झालेल्या बैठकीत दिले होते. परंतु त्या आश्वासनाला बासनात गुंडाळून पुन्हा तो प्लॉट रामदेव सिंथेटीक या उद्योगाला विकण्याची प्रक्रीया सुरू केल्याचे वृत्त लोकमतमध्ये सर्वप्रथम प्रसिद्ध झाल्यानंतर मैदान बचाव संघर्ष समिती स्थापन करून बोईसरकरांनी लढा उभारला आहे.
मैदान बचाव संघर्ष समितीने बोईसर बंद मध्ये सहभागी होण्याकरीता बोईसर मधील शैक्षणिक संस्था, रिक्षा युनियन, बार अँड रेस्टॉरंट असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, उद्योजकांच्या संघटना आदी सर्वांनी आवाहन केले आहे. तर बंद शांततेत व यशस्वी होऊन मैदान परत मिळविण्याची लढाई जिंकण्याकरीता संघर्ष समिती व सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी कंबर कसून कामाला लागले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Tomorrow's call by Boiser