लॉकडाऊन शिथिल झाले तरी मोलकरणींवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 23:32 IST2020-06-12T23:32:16+5:302020-06-12T23:32:22+5:30
शासनाने लॉकडाऊन शिथिल केला असला तरी कामवाल्या बार्इंना कामावर येण्यास मज्जाव केला जात आहे

लॉकडाऊन शिथिल झाले तरी मोलकरणींवर उपासमारीची वेळ
प्रतीक ठाकूर ।
विरार : एप्रिलपासून सुरू झालेल्या लॉकडाऊन कालावधीचे टप्पे खबरदारीच्या कारणास्तव वाढत गेल्याने हातावर पोट असलेल्या असंख्य नागरिकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्याने कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा कसा? असा प्रश्न त्यांना पडला असून घरोघरी धुणीभांडी करणाऱ्या मोलकरणींवर उपासमारीची वेळ आली आहे.
शासनाने लॉकडाऊन शिथिल केला असला तरी कामवाल्या बार्इंना कामावर येण्यास मज्जाव केला जात आहे. कोरोनाच्या भीतीने हा निर्णय घेतला जात आहे. कोरोनासारख्या जागतिक आपत्तीने वसई-विरार महापालिका परिसरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईत जाणाºया कर्मचाऱ्यांमुळे महापालिका हद्दीत कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला. त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर अद्याप कायम आहे.
शासनाने लॉकडाऊनचे नियम शिथिल केले असले तरी घराबाहेर पडताना नागरिक दहावेळा विचार करत आहेत. अशा वेळी बाहेरून घरी कामासाठी येणाºया मोलकरीण बार्इंना कामावर बोलावण्याचा धोका कोणीही पत्करायला तयार नाही. घरचे काम कष्टाचे असले तरी कोणताही धोका न पत्करता गृहिणीच घरची कामे करत आहेत. सध्या लॉकडाऊनमध्ये पुरूषही घरीच अडकून पडल्याने घरची कामे करण्यास ते गृहिणींना मदत करत आहेत. त्यामुळे कामवाल्या बार्इंना घरी कामासाठी बोलावण्याच्या मनस्थितीत सध्यातरी काही मंडळी नाहीत.
शासनाचे दुर्लक्ष नको!
या काळात त्यांच्या होणाºया उपासमारीकडे शासनाने कानाडोळा करू नये. जेवढे शक्य होईल तेवढी मदत शासकीय पातळीवरून या गरीब बार्इंना पोहोचवण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.