आठशे होमगार्डवर घरी बसण्याची वेळ

By Admin | Updated: July 27, 2016 03:12 IST2016-07-27T03:12:53+5:302016-07-27T03:12:53+5:30

वर्षानुवर्षे शासनाच्या सेवेत निष्काम सेवा ब्रिदवाक्य जपून १२-१२ तास पोलीसांसोबत कर्तव्य बजावणाऱ्या गृहरक्षकदल जवानांना (होमगार्ड्स) शासनाच्या नवीन निर्णय

Time to sit at home on eight hundred home guards | आठशे होमगार्डवर घरी बसण्याची वेळ

आठशे होमगार्डवर घरी बसण्याची वेळ

पालघर/नंडोरे : वर्षानुवर्षे शासनाच्या सेवेत निष्काम सेवा ब्रिदवाक्य जपून १२-१२ तास पोलीसांसोबत कर्तव्य बजावणाऱ्या गृहरक्षकदल जवानांना (होमगार्ड्स) शासनाच्या नवीन निर्णय व आदेशामुळे घरी बसण्याची वेळ आलेली असून, अनेक वर्षे कर्तव्य बजावणाऱ्या जिल्हयातील सुमारे ८०० होमगार्ड्सना या आदेशामुळे सेवेतून दूर व्हावे लागणार आहे.
जिल्हयातील तालुका पथकांच्या होमगार्ड्सनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे एकत्र एऊन होमगार्ड्सवर होत असलेल्या अन्यायाविरूध्द वाचा फोडत या होमगार्ड्सनी मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक शारदा राऊत व जिल्हा महसूल तहसीलदार राजेंद्र नवले यांच्याकडे दिले.
या शासन निर्णयाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने सुरू असून शासनाने होमगार्डवर लादलेल्या जाचक अटी टाकून ३ वर्षीय पुर्ननियुक्ती बंद करावी, ज्या होमगार्डसची नावे कमी करण्यात आली आहेत. अशांना सेवेत रूजू करावे, सेवाकाळ ५८ वर्षापर्यंत असावा तसेच अनियमीत मिळणारा बंदोबस्त कायमस्वरूपी मिळावा अशा मागण्या या निवेदनात असून यावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास जिल्हयातील सर्व होमगार्ड्स बंदोबस्त व कवायतींवर बहिष्कार टाकतील असा इशारा तसेच नवीन भरती पक्रिया राबविण्यास आंदोलन केले जाईल असा इशाराही निवेदनाव्दारे दिला आहे. (वार्ताहर)

Web Title: Time to sit at home on eight hundred home guards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.